शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पगुच्छऐवजी हेल्मेट द्या भेट!

By admin | Updated: April 23, 2017 02:11 IST

लग्नसमारंभ अथवा वाढदिवस आदी कार्यक्रम म्हटले की, संबंधितांना आपण पुष्पगुच्छ भेट देतो. परंतु या पारंपरिक पद्धतीला फाटा देत पुष्पगुच्छऐवजी आयुष्य सुरक्षित

नाशिक : लग्नसमारंभ अथवा वाढदिवस आदी कार्यक्रम म्हटले की, संबंधितांना आपण पुष्पगुच्छ भेट देतो. परंतु या पारंपरिक पद्धतीला फाटा देत पुष्पगुच्छऐवजी आयुष्य सुरक्षित ठेवणारे हेल्मेट भेट देण्याचा अभिनव उपक्रम नाशिक पोलिसांनी हाती घेतला असून, ‘लोकमत’च्या वर्धापनदिनाप्रसंगी त्याचा शुभारंभ करण्यात आला.दुचाकींचे वाढते अपघात व त्यामधील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शहरात वाढत आहे. यामुळे वाहन चालविताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘लोकमत’च्या २२ व्या वर्धापनदिनास आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह शुभेच्छा द्यावयास आलेले पोलीस आयुक्त डॉ़ रविंद्र कुमार सिंगल यांनी ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्याकडे हेल्मेट सुपुर्द करत उपक्रमाचा शुभारंभ केल्याची घोषणा केली. याप्रसंगी सदर हेल्मेट सिंगल यांच्याच हस्ते छायाचित्रकार नीलेश तांबे यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय पाटील, दत्तात्रय कराळे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, जयंत बजबळे आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने रस्ता सुरक्षा सप्ताह तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून हेल्मेट वापराबद्दल जनजागृती चालविली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर कारवाई करताना ‘हेल्मेटचे महत्त्व’ या विषयावर निबंध लिहून घेतानाच हेल्मेट वापरणाऱ्या चालकांना चौकाचौकात गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्याचा अनोखा उपक्रमही राबविण्यात आला. (प्रतिनिधी)प्रत्येकाचे जीवन महत्त्वाचे आहे. ते असे अपघातातून संपू नये, यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. आपण लग्नकार्य, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांना पुप्षगुच्छ व इतर भेटवस्तू देतो. त्याऐवजी आपल्या आप्तेष्टांना अनपेक्षित अपघातांतून जीवनदान देण्यासाठी हेल्मेट भेट देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. - डॉ. रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक.