शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

डुलकी येऊ न देणारे हेल्मेट!

By admin | Updated: February 8, 2016 04:34 IST

दुचाकी चालविताना डुलकी येते, हेल्मेट घातले तर डोके तापते, मोबाइलवरही बोलता येत नाही, हेल्मेट न वापरण्यासाठी तुम्ही अशी कारणे शोधत असाल तर थांबा

विनोद गोळे,  पारनेरदुचाकी चालविताना डुलकी येते, हेल्मेट घातले तर डोके तापते, मोबाइलवरही बोलता येत नाही, हेल्मेट न वापरण्यासाठी तुम्ही अशी कारणे शोधत असाल तर थांबा! ही बातमी वाचून तुमच्या या समस्या सुटतीलच; शिवाय तुमचा प्रवास आनंददायी व सुरक्षित होईल़ आनंद किसन मुळे या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तुमच्या या समस्या सोडविण्यासाठी आणि आनंददायी प्रवासासाठी एक अनोखे हेल्मेट तयार केले आहे़अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयातील अकरावीच्या विज्ञान शाखेत आनंद शिक्षण घेतोय़ हेल्मेट न वापरण्यासाठी अनेक जण अनेक बहाणे शोधतात़ त्यातील काही बहाण्यांचा आनंदने अभ्यास केला़ हेल्मेट घातल्यानंतर डोके तापते, डुलकी येते आणि कोणाचा फोन आला तर तोही रिसिव्ह करता येत नाही, अशी कारणे सररास कानावर येतात़ मात्र, आता यातील एकही कारण कोणीही सांगू शकणार नाही, असे हेल्मेट देवीभोयरेसारख्या छोट्या खेड्यात राहणाऱ्या आनंदने तयार केले आहे़ आनंदच्या घराशेजारील एक वायरमन दुचाकी अपघातात मयत झाला़ त्याच्या अपघाती मृत्यूमुळे छोटी-छोटी मुले रडताना पाहून आनंदचेही मन हेलावले़ हेल्मेटची सक्ती नको तर ते वापरण्यासाठी युक्ती करायला हवी, या विचाराने आनंदचा शोध सुरू झाला़ यात त्याला त्याचा भाऊ अशोक याने मदत केली़ अशोक बी़एस्सीचे शिक्षण घेतोय़ आनंदच्या संकल्पनेतून अवघ्या बाराशे रुपयांत हे हेल्मेट तयार झाले आहे़ हेल्मेटला आतून थर्माकोलचे आवरण आहे. त्यात हेल्मेटवर प्रेशर सेन्सर व रेडिओ सर्कीट बसविले आहे. त्याचे कनेक्शन दुचाकीच्या प्लगजवळ बसविले. त्यामुळे हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी सुरू होत नाही़ यासह त्यात ब्लुटूथ असून फोनही घेता येतो़ त्यात दोन ठिकाणी सेल जोडले असून, एक छोटा पंखा जोडला आहे. या पंख्यातून थंड हवा मिळते व आतली गरम हवा बाहेर फेकली जाते़ रेडिओ कंट्रोल सर्कीटच्या माध्यमातून व्हायब्रेटर कार्यान्वित होते. हे व्हायब्रेटर चालकाला डुलकी येऊ देत नाही़ प्रेशर सेन्सरच्या पट्ट्यांवर दाब येऊन सर्व यंत्रणा कार्यान्वित होते. राज्यात सगळीकडे दुचाकीधारकांना हेल्मेटची सक्ती करण्यात येत आहे. पण सक्तीपेक्षा जर हेल्मेटमध्ये अशा सुविधा दिल्यास प्रत्येक जण आवडीने हेल्मेट वापरतील व अपघात टळतील, म्हणून हे हेल्मेट बनविले.- आनंद मुळे, हेल्मेट बनविणारा विद्यार्थी