शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट बंधनकारक व्हावे

By admin | Updated: February 5, 2016 04:02 IST

हेल्मेट वापरणे लवकरच बंधनकारक करण्याची परिवहनमंत्र्यांनी केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे;

नागपूर : हेल्मेट वापरणे लवकरच बंधनकारक करण्याची परिवहनमंत्र्यांनी केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे; सोबतच दुचाकी वाहनाच्या मागील सीटवर बसणाऱ्यांनाही हेल्मेट बंधनकारक व्हावे, असे मत ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले आहे. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यात लवकरच हेल्मेट वापरणे बंधनकारक करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांचा हा निर्णय अभिनंदनीय आहे. ‘लोकमत’ समूहाने यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वेळोवेळी अभियान राबविण्यात आले. रस्ते अपघातातील मृत्यूचा मुद्दा उपस्थित करून ‘लोकमत’ समूहाने हेल्मेट बंधनकारक करण्यावर भर दिला. रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचे बळी जातात. यातील सुमारे दीड लाख प्रवासी १५ ते ३५ वयोगटातील असतात. ही सामाजिक व राष्ट्रीय हानी आहे. यातील ९० टक्क्यांहून अधिक जणांनी वाहन चालविताना हेल्मेट वापरले नसल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. हेल्मेट वापरणे बंधनकारक असते तर ही हानी झाली नसती. परंतु प्रशासनाने दुचाकी वाहन चालकांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्याच्या दृष्टीने गांभीर्याने प्रयत्न केलेले नाहीत.नियमांचे पालन झालेले नाही. वास्तविक यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. दिल्ली व जयपूर या शहरांत हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे, तर मग नागपूरसह राज्यातील इतर भागांत असे का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. आता दिवाकर रावते यांनासुद्धा या दिशेने गांभीर्याने विचार करावा लागणार आहे, असे ते म्हणाले.हेल्मेट बंधनकारक करतानाच बाजारात आयएसआय मार्क असलेलेच हेल्मेट विकले जातील. यासाठी प्रशासनाला ठोस भूमिका घ्यावी लागेल. तसेच लोकांनीसुद्धा हेल्मेट खरेदी करताना आयएसआय मार्क आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे खा. दर्डा म्हणाले. वाहनउत्पादक कंपन्यांनी गाडीचे लाईट आपोआप मंद होण्याची सुविधा असलेल्या वाहनांची निर्मिती करावी. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे दुसऱ्या वाहनाचा चालक विचलित होणार नाही. यासाठी सरकारने धोरण सुनिश्चित केले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. (प्रतिनिधी)