शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

हेल्मेटसक्तीचे ओझे मारले केंद्राच्या माथी

By admin | Updated: February 8, 2016 04:44 IST

स्वचलित दुचाकी वाहन चालविणारा चालक आणि त्याच्या मागे बसणारा सहप्रवासी अशा दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती शनिवारपासून राज्यभरात लागू करण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात

पुणे/मुंबई : स्वचलित दुचाकी वाहन चालविणारा चालक आणि त्याच्या मागे बसणारा सहप्रवासी अशा दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती शनिवारपासून राज्यभरात लागू करण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात तीव्र झालेली जनभावना लक्षात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट सक्तीचे ओझे केंद्र सरकारच्या डोक्यावर ठेवले. मोटार वाहन कायद्यामध्ये बदल करण्याचे अधिकार केंद्र शासनाला आहेत, हेल्मेटचे बंधन दूर करण्यासाठी केंद्र शासनाला कायद्यात बदल करावा लागेल, असे रावते यांनी सुचविले आहे.शनिवारपासून राज्यभर हेल्मेट घालण्याची सक्ती लागू करण्यात आल्यानंतर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर जोरदार कारवाई करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात पुण्यात सर्वपक्षीय हेल्मेटसक्ती विरोधी कृती समिती स्थापन करून आंदोलन छेडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रावते यांनी तातडीने पुण्यात येऊन आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार नीलम गोऱ्हे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक आदी उपस्थित होते. पुणे शहरात अरूंद रस्ते, दुचाकीस्वारांची प्रचंड संख्या, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था आहे, यामुळे हेल्मेटसक्ती योग्य नसल्याची भूमिका मांडण्यात आली. बापट यांच्यासह लोकप्रतिनिधींही हेल्मेट न वापरणाऱ्यांवरील कारवाई योग्य नसल्याची भूमिका मांडली. त्यावर रावते म्हणाले, ‘उच्च न्यायालयामध्ये वाहतूक प्रश्नाबाबात ३ सदस्यीय समिती स्थापन केली असून दर ६ महिन्यांनी या समितीसमोर राज्य शासनाला वाहतूक नियमांची काय अंमलबजावणी केली याचा अहवाल सादर करावा लागतो. न्यायालयाच्या आदेशामुळे हेल्मेट न घालणाऱ्यांविरूध्द कारवाई करणे भाग पडत आहे. शहराच्या हदद्ीत हेल्मेट घालण्यापासून सुट द्यावी, महिलांना त्यामधून सवलत द्यावी आदी मुद्यांवर विधी व न्याय विभागाच्या सचिवांशी चर्चा केली जाईल. टप्प्याटप्प्याने हेल्मेट घालण्यास पुणेकरांची तयारी असल्याचे चर्चेमधून दिसून येत आहे.’खासदारांनी अशासकीय विधयेक आणावेमहाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या अधिवेशनामध्ये याबाबतचे अशासकीय विधेयक मांडून याकडे केंद्राचे लक्ष वेधावे, अशी सूचनाही मंत्री रावते यांनी केली. हेल्मेटबाबत पुणेकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विधी व न्याय विभागाच्या सचिवांशी चर्चा करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.पुणेकरांमुळेच सक्ती : मोटर वाहन कायदा १९८८च्या कलम १२९नुसार दुचाकी वाहनचालक आणि त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे बंधनकारक आहेच. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात पुणेकर मंडळींनी जनहित याचिका केली होती. त्यावर, काटेकोर अंमलबजावणीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती रावते यांनी माध्यमांशी बोलताना दिली.