शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

नमस्ते, आपका स्वागत है...मै हूँ रेल हॉस्टेस...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 10:26 IST

 नमस्ते भारतीय रेल में आपका स्वागत है...अशा सुमधूर शब्दांत रेल्वे एक्स्प्रेसमध्ये तुमचं स्वागत केल्यास त्याचे नवल वाटायला नको.

ठळक मुद्दे नमस्ते भारतीय रेल में आपका स्वागत है...अशा सुमधूर शब्दांत रेल्वे एक्स्प्रेसमध्ये तुमचं स्वागत केल्यास त्याचे नवल वाटायला नको. रेल्वेमधील डब्ब्यात प्रवेश करताच हसतमुखाने स्वागत करणाऱ्या ‘रेल सुदंरी’साठी आयआरसीटीसी प्रयत्न करत आहे. भारतीय रेल्वेची अत्याधुनिक आणि वेगवान ओळख बनलेल्या तेजस एक्सप्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रेल सुंदरी ही संकल्पना राबवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे.

- महेश चेमटे

मुंबई, दि. 18-  नमस्ते भारतीय रेल में आपका स्वागत है...अशा सुमधूर शब्दांत रेल्वे एक्स्प्रेसमध्ये तुमचं स्वागत केल्यास त्याचे नवल वाटायला नको. रेल्वेमधील डब्ब्यात प्रवेश करताच हसतमुखाने स्वागत करणाऱ्या ‘रेल सुदंरी’साठी आयआरसीटीसी प्रयत्न करत आहे. भारतीय रेल्वेची अत्याधुनिक आणि वेगवान ओळख बनलेल्या तेजस एक्सप्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रेल सुंदरी ही संकल्पना राबवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे.

विमानातील सुखद आणि गारेगार प्रवासाचा आनंद घेता यावा, यासाठी विमानाच्या धर्तीवर रेल्वे मंत्रालयाने तेजस एक्सप्रेसची निर्मिती केली. मुंबई-करमळी मार्गावर चालणारी तेजस एक्सप्रेस अल्पावधीत लोकप्रिय ठरली. तेजसच्या प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) विशेष उपाययोजना करण्यात येत आहे.विमानातील एअर हॉस्टेस अर्थात हवाई सुंदरीच्या धर्तीवर मध्य रेल्वेदेखील ‘रेल हॉस्टेस’ अर्थार ‘रेल सुंदरी’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. सप्टेंबरपर्यंत या संकल्पनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास दिवाळीतील तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांना ‘रेल हॉस्टेस’च्या आदरातिथ्याचा अनुभव घेता येणार आहे. तेजस एक्स्प्रेसमधील दोन डब्ब्यांसाठी एक ‘रेल सुंदरी’ची नेमणूक करण्यात येईल. १२ डब्ब्यांमध्ये ६ रेल सुंदरी प्रस्तावित आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास रेल हॉस्टेसची नेमणूक करण्यात येणार आहे. यावर प्रवाशांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहे. ही संकल्पना यशस्वी झाल्यास भविष्यात प्रत्येक डब्ब्यांसाठी एक रेल सुदंरी नेमण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

आणखी वाचा

...अन् ती स्वगृही परतली

पेट्रोल पंपांवर मिळणार औषधे, भाज्या, किराणा

एकंदरीत भारतीय रेल्वेचा तेजसच्या माध्यमाने कायापालट झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एक्सप्रेसमध्ये नवनवीन होणाऱ्या  प्रवाशांभिमुख प्रयोगामुळे ‘रेल बढे, देश बढे’ ही संकल्पना आकार घेत असल्याचे दिसून येत आहे. आयआरसीटीसीच्या कल्पक प्रयोगामुळे तेजसच्या प्रवाशांची ‘दिवाळी’ होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे