शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो तावडे साहेब मी आत्महत्या करतोय...

By admin | Updated: October 6, 2016 23:15 IST

हॅलो शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब मी विनाअनुदानित शाळेचा शिक्षक बोलतो ... साहेब... विनाअनुदानित शाळेत बिनपगारी काम करतोय आता सहन होत नाही ... मी आत्महत्या

- श्यामकुमार पुरे/ऑनलाइन लोकमत

सिल्लोड, दि.06 -  हॅलो शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब मी विनाअनुदानित शाळेचा शिक्षक बोलतो ... साहेब... विनाअनुदानित शाळेत बिनपगारी काम करतोय आता सहन होत नाही ... मी आत्महत्या करत आहे... असा फोन केला... अन् फोन कट करुन स्विच ऑफ केला.यामुळे शिक्षण मंत्र्यांसह पोलीस यंत्रणा खड़बडून जागी झाली... अखेर त्या शिक्षकाला पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले.सिल्लोड तालुक्यातिल कायगांव येथील नँशनल मराठी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आसलेले शिक्षक समाधान बाजीराव पांढरे हे बिन पगारी काम करत असल्याने त्यांनी चक्क (दि. 5-रोजी ) शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना फोन करुन साहेब... बिन पगारी काम करतोय आता सहन होत नाही ... मी आत्महत्या करत आहे... असा फोन केला आणि फोन कट केला. यानंतर लगेच फोन स्विच ऑफ केला. या प्रकारानंतर  शिक्षण मंत्र्यांनी पीएमार्फत त्या शिक्षकाला कॉल केला पण फोन लागत नव्हता. त्याने खरच आत्मह्त्या तर केली नाही. या भीतीने शिक्षण मंत्र्यांनी आलेला नंबर अख्या महाराष्ट्रातील पोलीस अधिक्षक कार्यालयास कळविला.

त्या शिक्षकास कुठल्याही परस्थित शोधा असे आदेश येताच औरंगाबादवरुन सिल्लोड तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनला फोन येऊ लागले. फोनची दखल घेत त्या नंबरची चौकशी सुत्रे काही क्षणातच चालु झाले पंरतु तो नंबर कोणाचा आहे, हे कळत नसल्याने पोलीसांनी शेवटी मोबाईल लोकेशन्स घेतला असता तो मोबाईल नंबर सिल्लोड परिसरातील टाॅवर अंर्तंगत दिसुन आल्याने पोलिसांची पुन्हा धावपळ वाढली. शेवटी विनाअनुदानित कोणत्या शाळा या परिसरात आहे. त्यानुसार शोध मोहीमेस सुरुवात करण्यात आली. अन शेवटी कायगांव येथील नँशनल मराठी शाळेच्या मुख्यध्यापकाचा नंबर असल्याचे कळताच पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्याला ताब्यात घेतले. हा शिक्षक वडोद बाजार पोलिसांच्या ताब्यात आहे. रात्री उशीरा पर्यन्त त्याचे जाब जबाब पोलीस घेत होते.

दरम्यान, एकंदरित काय तर एका शिक्षकाने पोलीस आणि  शिक्षण विभागाच्या कर्मचा-यांची झोप उडविली.