शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!
2
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद; विरोधकांकडून टीका; भाजपची सारवासारव
3
पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा
4
राज्यात चार हजार १३५ चार्जिंग स्टेशनसाठी नवीन ईव्ही पॉलिसीनुसार सबसिडी
5
अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस!
6
‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
7
४० लॉ कॉलेजांना प्रवेशबंदी; मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यास लाखाचा दंड
8
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
9
IPL 2025 PBKS In Final: एक चूक नडली! कॅच सुटला तिथंच MI च्या हातून मॅचही निसटली (VIDEO)
10
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
11
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
12
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
13
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
14
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
15
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
16
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
17
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
18
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
19
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
20
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

डरोगे तो मरोगे... धाडसी चिमुकल्यांचा संदेश

By admin | Updated: July 19, 2016 05:20 IST

चोराला पकडून त्याच्याशी दोन हात करणाऱ्या मॅथ्यू सुधाकर नाडार (११) आणि विन्सी सुधाकर नाडार (१५) यांचा पोलीस उपायुक्तांकडून सत्कार करण्यात आला.

मुंबई : बहिणीचा मोबाइल हिसकावून पळ काढत असलेल्या चोराला पकडून त्याच्याशी दोन हात करणाऱ्या मॅथ्यू सुधाकर नाडार (११) आणि विन्सी सुधाकर नाडार (१५) यांचा पोलीस उपायुक्तांकडून सत्कार करण्यात आला. या वेळी आपली भीती हा आपला सर्वात पहिला शत्रू असतो. त्यामुळे जर ही भीतीच नसेल, तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे ‘डरोगे तो मरोगे’ असा संदेश या चिमुकल्यांनी दिला. अँटॉप हिल परिसरात राहाणारा मॅथ्यू हा सहावी इयत्तेत तर विन्सी दहावी इयत्तेत शिक्षण घेतात. रविवारी सकाळी प्रार्थनेसाठी चर्चकडे जात असताना एका लुटारूने विन्सीचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिवाची पर्वा न करता, या चिमुरड्याने चोराशी दोन हात केले. मॅथ्यूने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘बहिणीसोबत जात असताना अचानक एक मद्यपी बहिणीकडे येत असताना दिसला. मी थेट तिच्या पुढे उभे राहून तिला आधार दिला. त्यानंतर, चोर माझ्या बहिणीच्या हातातील मोबाइल हिसकावत होता. मी रागाने माझ्या हातातील छत्रीने त्याला मारझोड करत बहिणीचा मोबाइल परत मिळविला,’ असे त्याने सांगितले. विन्सीच्या म्हणण्यानुसार, ‘आपल्या मनातली भीती हा आपला खरा शत्रू असतो. माझ्या मम्मी-पप्पाने मला नेहमीच न घाबरता प्रत्येक परिस्थितीशी झगडायचे, कसे हे शिकविले. शाळेतही सेल्फ डिफेन्सचे धडे देतात. त्यामुळे चोर अंगावर येणार हे समजताच आम्ही त्याच्याशी सामना केला. साधारण पाच ते दहा मिनिटे आमच्यात झटापट सुरू होती. अचानक समोरून आलेल्या टॅक्सीचालकाचे लक्ष जाताच त्याने आम्हाला मदत केली. लहान असलो म्हणून काय झाले? आम्हीही कुणापेक्षा कमी नाही,’ असे म्हणत तिने ‘सर्वांनी मनातली भीती दूर करत काम केल्यास सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात,’असे सांगितले. आज माटुंगा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांकडून दोघा चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)>माटुंगा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांकडून दोघा चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला तर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनीही सोशल मिडीयावरून कौतुक केले.