शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीच्या कॉम्प्युटरवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 03:48 IST

मुंबईतील एका रस्ते अपघातग्रस्तास मंजूर झालेली भरपाईची रक्कम देताना त्यावरील व्याजातून चुकीच्या पद्धतीने कापून घेतलेला ‘टीडीएस’

मुंबई : मुंबईतील एका रस्ते अपघातग्रस्तास मंजूर झालेली भरपाईची रक्कम देताना त्यावरील व्याजातून चुकीच्या पद्धतीने कापून घेतलेला ‘टीडीएस’ वसूल करण्यासाठी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्या कार्यालयातील तीन संगणकांवर टाच आणण्याच्या कारवाईवर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे.अशा प्रकारे टाच आणण्याचा आदेश मुंबईतील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने एका प्रकरणात दोन वर्षांपूर्वी दिला होता. त्याविरुद्ध विमा कंपनीने केलेली रिट याचिका न्या. गिरीश कुलकर्णी यांनी फेटाळून लावली. त्यामुळे ‘टीडीएस’ म्हणून कापलेली रक्कम कंपनीला अपघातग्रस्तास द्यावी लागणार आहे.भरपाई रकमेवरील व्याजातून ‘टीडीएस’ कापून घेणे प्राप्तिकर कायद्यान्वये आमच्यावर बंधनकारक आहे. त्यानुसार आम्ही ‘टीडीएस’ कापून ती रक्कम प्राप्तिकर विभागाकडे जमाही केली आहे. आता ती रक्कम पुन्हा वसूल करणे म्हणजे तेवढी रक्कम दोनदा द्यायला लावणे होईल. हवी तर अपघातग्रस्ताने कापून घेतलेली रक्कम परत मिळण्यासाठी, शक्य असल्यास प्राप्तिकर विभागाकडे अर्ज करावा, असे विमा कंपनीचे म्हणणे होते. मात्र न्यायालयाने ते अमान्य केले. वरळी नाका, मुंबई येथील सिद्धार्थनगरमध्ये राहणारे हुसैन बाबुलाल शेख हे जो जोसेफ यांच्या मोटारीच्या अपघातात जखमी झाले होते. न्यायाधिकरणाने जुलै २०१२ मध्ये ३.४३ लाख रुपयांची भरपाई अर्ज केल्याचा दिवसापासून ७.५ टक्के व्याजासह मंजूर केली. विमा कंपनीने व्याजासह ४.६० लाख रुपये जमा केले. परंतु व्याजाचा हिशेब करताना त्यातून ४०,०३४ रुपये ‘टीडीएस’ कापून घेतला. शेख यांनी पुन्हा न्यायाधिकरणाकडे अर्ज केला व पूर्ण भरपाई देण्याची विनंती केली. न्यायाधिकरणाने ती मंजूर केली व विमा कंपनीने कापून घेतलेली रक्कम स्वत:हून न दिल्यास त्यांच्या कार्यालयातील तीव संगणकांवर टाच आणण्याचा आदेश दिला. (विशेष प्रतिनिधी)