शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्केंच्या सरकारी घरबांधणीवर टाच

By admin | Updated: November 9, 2016 05:08 IST

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेत यापुढे केवळ एकाच कंपनीची मक्तेदारी राहणार नाही.

अतुल कुलकर्णी, मुंबई पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेत यापुढे केवळ एकाच कंपनीची मक्तेदारी राहणार नाही. शिर्के आणि कंपनी यांना म्हाडाने घर बांधणीची कामे देण्याबाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी लोकमतशी बोलताना दिली. जमीन ताब्यात नसताना आणि पंतप्रधान आवास योजनचे नियम डावलून टेंडर काढण्यात आले असून त्यामागील हेतूची चौकशी केली जाणार आहे.‘जमीन नसताना म्हाडाचे कागदी इमले’ असे वृत्त लोकमतने मंगळवारी प्रकाशित केले होते. आजच मंत्रिमंडळापुढे या विषयावरील सादरीकरण होते. त्यात या बातमीचे पडसाद उमटले. सोलापूरातही जमिनीचा पत्ता नसताना ३० हजार घरांची योजना कशी मंजूर केली, यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठक चालू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री मेहता यांना नेमके काय घडले आहे, अशी विचारणा केली. तेव्हा मेहता यांनी तेथेच काय घडले हे मुख्यमंत्र्यांकडे एका कागदावर लिहून दिले. म्हाडाचे उपाध्यक्ष एस.एस. झेंडे यांच्याकडे या सगळ्याचा खुलासा मागविण्यात आला असून त्या ११ कामांची निविदा काढण्यामागचे हेतू चांगले नसल्याचे स्पष्ट झाले तर त्यांच्यावर कारवाई देखील केली जाईल, असेही मेहता यांनी स्पष्ट केले. २०१४ पासून म्हाडाने परवडणाऱ्या घरांच्या बांधणीची जी कामे खाजगी बांधकाम व्यावसायिकांना दिली आहेत, व ज्यांनी ती अद्याप सुरु केलेली नाहीत त्या सगळ्यांच्या निविदा देखील रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले. शिर्के असोत किंवा अन्य कोणीही असो, सगळ्यांना आता केंद्र शासनाच्या नव्या नियमावलीनुसारच काम करावे लागेल, असेही मेहता म्हणाले. म्हाडाने ‘टर्नकी बेसीस’वर घर बांधणीचे काम शिर्के आणि कंपनीला देण्याचा शासन आदेश काढला होता. त्यामुळे म्हाडामध्ये होणारी जवळपास सगळी घरबांधणी शिर्के यांची कंपनी करत होती. हे गेले अनेक वर्षे चालू होते. मात्र तो आदेशही रद्द करण्यात आला असून आता बांधकाम क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे, सरकारला मोठ्या प्रमाणावर घर बांधणी करायची आहे, त्यामुळे उत्तम दर्जाचे बांधकाम करता यावे यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या देशभरातील कंपन्यांकडून प्रस्ताव मागवावेत आणि त्यातून पात्र ठरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची यादी तयार करावी असा शासन आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला आहे. त्यामुळे यापुढे कोण्या एका बिल्डरला किंवा कंपनीला म्हाडाचे काम करता येणार नाही असेही मेहता यांनी सांगितले.