शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिरोली परिसरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 18, 2016 01:21 IST

अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली

ओझर : १९७२मध्ये पडलेल्या दुष्काळात जेवढी भयानक स्थिती नव्हती त्यापेक्षा अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली आहे. पाण्यासाठी विहिरींची खोदकामे करून खडकाशी झुंज या परिसरातील शेतकरीवर्ग देत आहेत.शिरोली बुद्रुक गावाचा पश्चिम भाग शिरोली खुर्द, कुमशेत, महाबरेवाडी, गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ ही कुकडी नदीच्या काठवरची गावे आहेत. या नदीवर असलेल्या माणिकडोह धरणात जेमतेम फक्त पिण्यासाठीचा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना रब्बी हंगामातच सर्व धरण मोकळे केले. वर्षानुवर्षे तालुक्यात बागायत गावे म्हणून ओळख असलेली ही गावे गेली तीन महिने पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या गावांसाठी कुकडी नदीवर असणारे तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तीन महिन्यांपूर्वी कोरडे पडले आहेत. ना मायबाप सरकार काही करत, ना निसर्गाची साथ अशा कात्रीत या गावांतील शेतकरीवर्ग सापडला आहे. कर्ज काढून विहिरींची खोदकामे शेतकरी करीत आहे. परंतु भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली असल्यामुळे खडकाशी झुंज देऊनही पाणी मिळत नाही. शेतमाल पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र जागोजागी पाहावयास मिळत आहे.न्याय कोणाकडे मागावा..?या वर्षी शेतकऱ्यांना कांद्याने रडवले. या पिकाचा उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही. नीचांकी दराची पातळी कांद्याने गाठली आहे. उन्हाळी हंगामातील पिकांवर सर्व अर्थकारण सावरले असते. परंतु पाण्याने धोका दिल्यामुळे या गावांतील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला असल्याचे चित्र आहे. पूर्वीचा बागायत गावाचा शिक्का असल्यामुळे महसूल विभागाच्या पैसेवारींच्या गणितामुळे ही गावे दुष्काळग्रस्त गावांमध्ये मोडत नाहीत. परंतु सध्या दुष्काळाचा सामना करीत असलेल्या या गावांतील शेतकऱ्यांना न्याय कोणाकडे मागावा अशी अडचण निर्माण झाली आहे.पाण्याअभावी काही शेतकऱ्यांनी जमिनी पडीक ठेवल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धडपड करून उन्हाळी टोमॅटो घेतले. परंतु त्यांना सिजेंटा कंपनीच्या सदोष बियाणांनी धोका दिला. या गावांतील शेतकऱ्यांनी विघ्नहरने अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना दुष्काळी परिस्थितीतून सावरण्यासाठी साकडे घातले आहे. शिरोली बुद्रुक कृषक सेवा या दहा गावांच्या सोसायटीच्या माध्यमातून विघ्नहरने अध्यक्ष तथा या सोसायटीचे अध्यक्ष सत्यशील शेरकर या गावांतील शेतकऱ्यांसाठी दुष्काळात देवदूताची भूमिका बजावत आहेत.