शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कॅश डिपॉझिट करण्यासाठी एटीएमच्या बाहेर प्रचंड गर्दी

By admin | Updated: November 8, 2016 22:45 IST

आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनात वापरता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घेतला.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनात वापरता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घेतला. या निर्णयामुळे 500 आणि 1000 च्या नोटा डिपॉझिट करण्यासाठी एटीएमच्या बाहेर अनेकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता 500 आणि 1000 च्या नोटा दैनंदिन व्यवहारात वापरता येणार नाहीत. 30 डिसेंबर 2016पर्यंत 500 आणि 1000च्या नोटा पोस्टात किंवा बँकेत जमा करता येणार आहेत. तसेच ज्यांना 500 आणि 1000च्या नोटा 30 डिसेंबर 2016पर्यंत जमा करता येणार नाहीत त्यांना 31 मार्च 2017पर्यंत आयडी प्रूफसह नोटा जमा करण्याची मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रुग्णालयात 11 नोव्हेंबर 2016पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. रेल्वे, बस आणि विमानतळाच्या तिकीट काऊंटरवर या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.

मात्र मोदींच्या या निर्णयामुळे राज्यभरासह मुंबईकरांची अक्षरशः तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. एकंदरित या निर्णयामुळे राज्यासह देशभरातील एटीएमच्या बाहेर 500 आणि 1000 च्या नोटा डिपॉझिट करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. तसेच, 100 रुपयांच्या नोटा काढण्यासाठी अनेकांनी एटीएमबाहेर रांगा लावल्या आहेत.