शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने शहराला झोडपले

By admin | Updated: August 1, 2016 02:39 IST

शनिवारपासून सुरू असलेल्या संततधारेने पनवेल शहरासह आजूबाजूच्या परिसराला चांगलेच झोडपून काढले.

पनवेल : शनिवारपासून सुरू असलेल्या संततधारेने पनवेल शहरासह आजूबाजूच्या परिसराला चांगलेच झोडपून काढले. शहरातील विविध भागात पाणी साचले होते. सायन-पनवेल महामार्गावरील पनवेल, कळंबोली परिसरातील तीन लेन पूर्णपणे पाण्यात गेल्या होत्या. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल आदी शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचे सुटी असूनही नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. ग्रामीण भागालाही पावसाने चांगलेच झोडपले असून गाढी नदी दुथडी भरून वाहत होती.पनवेल शहरातील पायोनिअर, मिडलक्लास सोसायटी, तालुका पोलीस ठाण्याचा परिसर सखल असल्याने याठिकाणी नेहमीच पाणी साचते. शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. जास्त पाऊस पडल्याने खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालवताना अडथळा येत होता. यासंदर्भात नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक शिवदास कांबळे यांनी मुद्दा उपस्थित करून ठोस उपाययोजनांची मागणी केली होती. मात्र नगरपरिषदेने याबाबत कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. नगरपरिषदेच्या वतीने २४ तास आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मात्र पावसाचा जोर वाढताच आपत्कालीन कक्ष देखील सुस्त पडत आहे. कळंबोली परिसरातील सायन-पनवेल महामार्ग, स्टील मार्केट, आरटीओ कार्यालय, खारघर टोल नाका आदी ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते.>अपघाताची शक्यता सायन-पनवेल महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. कोट्यवधी खर्चून उभारलेल्या या महामार्गावर कळंबोली, पनवेल परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. खड्ड्यात पाणी साचल्याने चालकांची वाहन चालवताना तारांबळ उडाली. महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने चालक हैराण झाले होते. कामोठे उड्डाणपूल, एलपी, नेरूळ याठिकाणीच्या उड्डाणपुलासह कोपरा गाव, कळंबोली सर्कल, हिरानंदानी बस स्थानक याठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी झाली होती. >गाढी नदीला आला पूरपनवेल : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल तालुक्यातील गाढी नदीला पूर आला आहे. परिसरातील लहान-मोठे नदी- नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे उमरोली गावात येण्या-जाण्यासाठी बांधलेल्या छोट्या पुलावरून (फरशी पूल) पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे पाचशे - सहाशे लोकसंख्या असलेल्या उमरोली गावाचा संपर्कतुटला आहे. रविवारी शाळेला सुटी असल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले नाही. मात्र पुलावर पाणी साचल्याने नोकरदार मंडळींना कामावर जाता न आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले.दरवर्षी मुसळधार पावसात फरशी पूल पाण्याखाली जात असून उमरोली गावाचा संपर्क तुटतो. ग्रामस्थांना दळणवळणासाठी पूर ओसरण्याची वाट बघावी लागते. गेल्या ६० ते ६५ वर्षांपासून हाच प्रकार सुरू आहे. याठिकाणी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करीत आहे. उमरोली गावातील नवीन पुलाचा प्रस्ताव कित्येक वर्षांपासून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या पुलासाठी जवळपास १ कोटीहून अधिक खर्च अपेक्षित आहे. याठिकाणी मोठ्या उंचीचा पूल कधी होणार, याकडे उमरोलीवासीय नागरिकांचे लक्ष लागून आहे.