शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची जोरदार हजेरी

By admin | Updated: September 19, 2016 01:31 IST

मावळासह कामशेत शहरात पावसाची संततधार सुरूअसून, शुक्रवारी व शनिवारी पावसाचा जोर वाढला होता.

कामशेत : मावळासह कामशेत शहरात पावसाची संततधार सुरूअसून, शुक्रवारी व शनिवारी पावसाचा जोर वाढला होता. जोरदार पडणाऱ्या या पावसामुळे मावळ परिसरातील शेतकरी सुखावला आहे. तसेच, या वेळी नाणे मावळातील वडिवळे धरणातून सात तास पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे कुंडलिका व इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे.मागील अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मावळातील भातपीक संकटात आले होते. पावसाअभावी भातपीक सुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे भातपिकाला पाण्याची आवश्यकता होती. शुक्रवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने मावळातील भात पिकावरील संकट टळले. भातपीक अनेक रोगांपासून वाचण्यासाठी या पावसाचा फायदाच झाला आहे. तसेच डोंगरावरील चाराही सुकत चालला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. या पावसाने चाऱ्याला फुटवे येऊन जनावरांसाठी चांगला चारा तयार होईल. नाणे मावळातील वडिवळे धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. गुरुवार पासून पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे धरण प्रशासनाने भोंगा वाजवून नदीकिनारी असणाऱ्या भाजगाव, उकसान, सोमवडी, कोळवाडी, उंबरवाडी, वळवंती, गोवित्री, करंजगाव आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शनिवारी (दि. १७) सातपासून ते रविवारी रात्री उशिरा २ वाजेपर्यंत २७२९ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली. धरणातून पाणी सोडल्यामुळे कुंडलिका व इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली होती. सांगिसे पुलाला नदीचे पाणी लागले होते. मागील १५ दिवसांपासून पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे अनेक भागातील भातपिके धोक्यात आली होती. पण शुक्रवारपासून पडत असलेला पाऊस लाभदायक ठरणार आहे. हा पाऊस आठ दिवस उशिरा झाल्याने उत्पादनात ५ ते १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे कृषी अधिकारी विनायक कोथिंबिरे यांनी सांगितले.(वार्ताहर)तळेगाव : आठवडा बाजारात धांदलतळेगाव दाभाडे : तळेगावममध्ये रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. तसेच पावसामुळे थंडी तापाच्या रुग्णामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यामध्ये रुग्णाची गर्दी दिसत आहे. आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. तसेच दिवसभर कोणीही फिरकले नसल्याने शेतकऱ्यांना माल पर न्यावा लागला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.