शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

येत्या 48 तासात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

By admin | Updated: June 10, 2017 13:34 IST

येत्या 48 तासात मुंबईसह कोकणामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10- सगळे जण आतुरतेने वाट बघणारा मान्सून अखेरीस दाखल झाला आहे. गुरूवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या 48 तासात मुंबईसह कोकणामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसंच सतर्क राहण्याचं आवाहनसुद्धा करण्यात आलं आहे. मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकला असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता उकाड्याने हैराण मुंबईकर दमदार पावसाने आता चांगलेच सुखावणार आहेत.
 
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणाच्या, अंतर्गत कर्नाटकाच्या, रायलसीमाच्या व आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे.
 
मागील २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असतानाच मुंबईतही पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत.
 
गुरुवारी रात्री मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी किंचितशी बरसात केली. त्यानंतर आकाश मोकळे झाल्याने पडलेल्या प्रखर सूर्यकिरणांनी मुंबईकरांना अक्षरश: घाम फोडला. आणि पुन्हा दुपारी दाटून आलेल्या ढगांनी दुपारसह सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार हजेरी लावली.
 
सायंकाळी झालेल्या पावसामुळे मुंबईत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. एकंदर उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व दमदार सरींनी दिलासा दिला असून, पडलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले आहेत.