शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस, सखल भागात साचलं पाणी

By admin | Updated: June 19, 2016 20:21 IST

येतो येतो म्हणत अखेर पावसानं महाराष्ट्रासह मुंबईत दमदार हजेरी लावली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 - येतो येतो म्हणत अखेर पावसानं महाराष्ट्रासह मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसानं हिंदमाता, किंग्ज सर्कल सारख्या सखल भागांत पाणी साचलं आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून)रविवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रवेश केला. 

मान्सूनने शुक्रवारी पूर्व विदर्भातून राज्यात प्रवेश केला असून, येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापण्यास अनुकूल परिस्थिती असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

(मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकला, कोकणात पावसाच्या सरी)

मॉन्सूनची उत्तरी सीमा रविवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. त्याची वाटचाल मध्य अरबी समुद्र, संपूर्ण गोवा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा पूर्वेकडील भाग आणि मध्य -पूर्व उत्तर प्रदेशाचा काही भाग, विदर्भ व बिहारच्या आणखी काही भागात व उत्तर अंतर्गत कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा आणि झारखंडच्या उर्वरित भागात झाली आहे.पुढील ४८ तासांत मध्य अरबी समुद्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश व बिहारच्या उर्वरित भागात, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या आणखी काही भागात व पश्चिम मध्य प्रदेशाच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे.

(विदर्भाच्या वाटेने मान्सून पोहोचला महाराष्ट्रात)

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांपैकी नागपूर १३, सोलापूर ३२२, अहमदनगर २१५, परभणी १२४, पणजी २१५, भिरा ८, रत्नागिरी २६, सांगली १३ मिमी पाऊस पडला. रविवारी दिवसभरात अलिबाग १६, पणजी ७, रत्नागिरी ८, मुंबई ३, महाबळेश्वर १, औरंगाबाद २, परभणी ७, सोलापूर ३, पुणे ५, लोहगाव ३ मिमी पावसाची नोंद झाली़. पुढील दोन दिवसात कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ ते २३ जून दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ पुणे व परिसरात पुढील काही दिवस पावसाच्या अधूनमधून सरी पडण्याची शक्यता आहे.