शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस

By admin | Updated: June 24, 2016 05:05 IST

दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाडा, तसेच विदर्भात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

पुणे/औरंगाबाद/पणजी : दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाडा, तसेच विदर्भात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. बुधवारी औरादवर मनसोक्त बरसलेला मान्सून गुरुवारी दुपारी चाकूर (जि. लातूर) तालुक्यातील हटकरवाडी परिसरावर तब्बल सव्वा तास धो-धो कोसळला. त्यामुळे शिवारातील बांध व पेरा वाहून गेला असून गावालगतची घरणी नदी दुथडी वाहू लागली आहे. हटकरवाडी हे गाव नळेगाव व घरणी गावाच्या मधोमध आहे. दुपारी या गावाच्या तीन ते चार किलोमीटर अंतरातच हा मुसळधार पाऊस झाला. असा मोठा पाऊस या परिसरात बऱ्याच वर्षांनंतर झाल्याचे उपसरपंच जी. टी. मलशेट्टी यांनी सांगितले. जन्मापासून असा मोठा पाऊस आम्ही पाहिला नसल्याची प्रतिक्रिया हटकरवाडी येथील प्रभाकर हुडगे यांनी दिली. अजनसोंडा (खु.), बोळेगाव या ठिकाणीही पाऊस झाला. याशिवाय मराठवाड्यामध्ये सिल्लोड, अहमदपूर, औरंगाबाद, हिंगोली आदी ठिकाणी पाऊस झाला. जालना जिल्ह्यात ७७.७७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. विदर्भात अकोला, नागपूर, बार्शी टाकळी, बुलडाणा, अंजनगाव आदी भागांमध्ये, तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, शेवगाव,चाळीसगाव, दौंड, महाबळेश्वर येथे पाऊस पडला. (लोकमत न्यूज नेटवर्क)नंदुरबार जिल्ह्यात वीज पडून दोन ठारनंदुरबार : राणीपूर (ता.शहादा) येथे वीज पडून शेतात काम करीत असलेल्या दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. गौरव हिंमत पावरा (सात वर्ष) व नर्मदाबाई शांतीलाल पावरा ( वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मान्सूनसाठी स्थिती अनुकूल झाली आहे. येत्या तीन ते चार दिवसात पश्चिम उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशाचा उर्वरित भाग, हरियाणा, चंडीगड-दिल्ली व पंजाबच्या बहुतांश भागात तो सक्रीय होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.