शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात जोरदार पाऊस

By admin | Updated: June 13, 2016 02:03 IST

येणार येणार म्हणून आठवडाभरापासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने अखेर रविवारी शहरात तासभर जोरदार हजेरी लावली.

लोणावळा : येणार येणार म्हणून आठवडाभरापासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने अखेर रविवारी शहरात तासभर जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून लोणावळ्यात असलेल्या ढगाळ वातावरणाला अखेर पाझर फुटला.सकाळपासूनच लोणावळा परिसरात पावसाचे काळे ढग दाटून येत होते. मात्र, पावसाचा थेंबही गळत नव्हता. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक पावसाने तासभर जोरदार हजेरी लावत सर्वांना सुखद धक्का दिला. रविवारच्या सुटीमुळे लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आहेत. या पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. पहिलाच पाऊस असल्याने स्थानिकांनीदेखील भिजण्याला प्राधान्य दिले. ग्रामीण भागात मात्र पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे भातरोपांची पेरणी करून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे.पावसाच्या आगमनाची चाहूल लागल्याने विंचवाचे बिऱ्हाड असणाऱ्या मेंढपाळांनी घराकडची वाट धरली. त्यामुळे महामार्गावर त्यांच्या बकऱ्या व घोडे परतीच्या मार्गावर दिसत होते. लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढणार ही शक्यता गृहीत धरून व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे. तसेच पर्यटकांच्या स्वागतासाठी लोणावळा परिसरातल हॉटेल सज्ज झाले आहेत. लोणावळ्यातील पर्यटकांनी हुल्लडबाजी करून नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाल्ीा आहे. भुशी धरण भरण्याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे. गेले अनेक दिवस पाऊस नसल्याने लोणावळ्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. परंतु पर्यटकांच्या गर्दीमुळे अर्थव्यवस्थाही सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(वार्ताहर)