शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

धुळे जिल्हा बँकेला भीषण आग

By admin | Updated: April 18, 2016 01:27 IST

येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहामजली प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर रविवारी सकाळी भीषण आग लागली़ त्यात तिसऱ्या मजल्यावरील

धुळे : येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहामजली प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर रविवारी सकाळी भीषण आग लागली़ त्यात तिसऱ्या मजल्यावरील प्रशासकीय कार्यालयासह, चौथ्या, पाचव्या मजल्यावरील साहित्य आणि सहाव्या मजल्यावरील विश्रामगृहही जळून खाक झाले आहे.सकाळी आठ वाजता आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर धुळे, शिरपूर, दोंडाईचा, मालेगाव, पारोळा, अमळनेर येथून १२ अग्निशमन दलाच्या बंबांनी तब्बल ७५ फेऱ्या मारून दुपारी एक वाजता ती आटोक्यात आली़ सुट्टीचा दिवस असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. कुणी जखमी झाल्याचेही वृत्त नाही. तिसऱ्या मजल्यावरील आग विझविण्यासाठी शिडी नसल्याने खालूनच पाण्याचा मारा सुरू करण्यात आला़ मात्र, आग भडकून इतर मजल्यांवरही पसरली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बँकेचे रेकॉर्ड ‘आॅनलाइन’ असून, ते नाशिक येथील ‘डिझास्टर सेव्हिंग साइट’वर सुरक्षित आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी दिली आहे. बँकेच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ९० शाखांमध्ये सोमवारी व्यवहार सुरळीत सुरू होतील. बँकेच्या साहित्यासह सर्व मालमत्तेचा विमा काढलेला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली. आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले असून, पंचनामा सुरू आहे. धुळे शहराचे आ. अनिल गोटे यांनी मात्र, आगीमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. बँकेतील भ्रष्टाचाराप्रकरणी अनेक अधिकारी, पदाधिकारी, तसेच आजी-माजी अध्यक्षांवर गुन्हे दाखल असून चौकशी पूर्ण झाली आहे. लवकरच त्यांची तुरुंगात रवानगी होणार असल्याची चाहूल लागल्याने पुराव्याचे कागदपत्र नष्ट करण्यासाठी आग लावली, असा आरोप गोटे यांनी केला आहे.आगीची सीआयडी, तसेच स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)बँकेला लागलेली आग हा एक अपघात आहे. कुणी न्यायदेवतेपेक्षाही स्वत:ला मोठे समजून आरोप करीत असतील, तर त्याबद्दल काहीच बोलणार नाही. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमातील स्टेजला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग लावली होती, असेही म्हणता येईल. - राजवर्धन कदमबांडे, अध्यक्ष, धुळे-नंदुरबार जिल्हा बँक