शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

उष्णतेची लाट कायम

By admin | Updated: May 24, 2015 02:15 IST

राज्यात आलेली उष्णतेची लाट शनिवारीही कायम होती. मात्र गेल्या चार दिवसांच्या तुलनेत राज्याच्या तापमानात शनिवारी किंचित घट झाली.

चंद्रपूरमध्ये ४७ अंश सेल्सिअस : विदर्भात सहा बळी, उत्तर भारतात होरपळपुणे /मुंबई : राज्यात आलेली उष्णतेची लाट शनिवारीही कायम होती. मात्र गेल्या चार दिवसांच्या तुलनेत राज्याच्या तापमानात शनिवारी किंचित घट झाली. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४७ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.अंदमानातून मान्सूनची आगेकूच सुरू झाली असली तरी नैर्ऋत्य मोसमी पावसाची शनिवारी उत्तरेकडे वाटचाल झालेली नाही. उत्तरेकडून महाराष्ट्रावर उष्ण वारे वाहतच असल्याने तापमानात वाढ नोंदविण्यात आली. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांचे कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढलेलेच असले, तरी गेल्या चार दिवसांच्या तुलनेत त्यात शनिवारी थोडी घट झाली. त्यामुळे प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही शहरांचे कमाल तापमान ४० ते ४३ अंशाच्या घरात स्थिरावले होते. अशीच स्थिती मध्य महाराष्ट्रातही होती. तेथील शहरांचे तापमान ४० अंशाच्या खाली आले. तापमानात थोडी घट झाली असली, तरी उकाडा मात्र आजही कायम होता.153 आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये आग ओकणाऱ्या उष्णतेच्या लाटेने शनिवारी आणखी ११० जणांचा बळी घेतला. त्यामुळे अवघ्या ४८ तासांत या दोन राज्यांमधील बळींची संख्या १५३ झाली आहे.च्त्याचवेळी या दोन राज्यांखेरीज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, ओडिशा, झारखंड या राज्यांत तसेच महाराष्ट्रातील विदर्भाच्या पट्ट्यात उष्णतेची लाट कायम असल्याचे हवामान खात्याने एका विशेष निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.च्या राज्यांखेरीज दिल्लीतही उष्णतेची लाट असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. च्आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दोन दाक्षिणात्य राज्यांमध्ये यंदाच्या उन्हाळ््यात उष्म्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३० झाली आहे. या राज्यांत शनिवारी ४७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्याचवेळी उत्तरेतील पंजाब, हरियाणा, दिल्ली ही राज्येही वाढत्या तापमानाने होरपळत आहेत.दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. च्प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. चंद्रपूरपाठोपाठ वर्ध्याच्या तापमानाचा पाराही वाढलेला आहे. विदर्भात उष्माघाताचे पुन्हा सहा बळी नागपूर : विदर्भात उष्माघाताची लाट कायम असून, गुरुवारी तिघांचा बळी गेल्यानंतर शुक्रवारी व शनिवारी सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात इतर दिवसांप्रमाणे आजचाही दिवस हॉट ठरला. जवळपास सर्वच शहरांत पाऱ्याने ४४ अंशाची पातळी ओलांडली होतीप्रमुख शहरांमधील तापमान पुणे ३६.२, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३५.२, महाबळेश्वर २८.९, मालेगाव ४३.२, नाशिक ३७.४, सांगली ३७, सातारा ३७.१, सोलापूर ४०.८, मुंबई ३५.७, रत्नागिरी ३४.६, औरंगाबाद ४०.४, परभणी ४३.२, अकोला ४२.५, अमरावती ४२.४, बुलडाणा ३९.५, चंद्रपूर ४७, नागपूर ४५.१, वाशिम ४०, वर्धा ४५.२, यवतमाळ ४१.८.