शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाचे हृदय धडधडले शेतकऱ्याच्या शरीरात

By admin | Updated: February 3, 2017 01:41 IST

दुचाकी अपघातात ब्रेन डेड झालेल्या शिक्षकाचे हृदय, दोन्ही किडन्या आणि यकृत (लिव्हर) या अवयवांचे दान करण्यात आले. बुधवारी शहरातील युनायटेड सिग्मा रुग्णालयात

औरंगाबाद : दुचाकी अपघातात ब्रेन डेड झालेल्या शिक्षकाचे हृदय, दोन्ही किडन्या आणि यकृत (लिव्हर) या अवयवांचे दान करण्यात आले. बुधवारी शहरातील युनायटेड सिग्मा रुग्णालयात सहा तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर या हृदयाचे प्रत्यारोपण एका गरजू शेतकऱ्याच्या शरीरात करण्यात आले. मराठवाड्यात प्रथमच अशी शस्त्रक्रिया पार पाडून नवा इतिहास रचण्यात आला.२९ जानेवारी रोजी झालेल्या दुचाकी अपघातात अनिल पंडित पाटील (४६) ब्रेन डेड झाले होते. कायगाव (ता.गंगापूर) येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. सिग्मा रुग्णालयातच नातेवाईकांनी त्यांचे अवयवदान करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) याची माहिती देण्यात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून अवयवदानाच्या प्रक्रिया सुरू झाली. अखेर याच रुग्णालयात हृदयरोगावर उपचार घेणाऱ्या एका ४४ वर्षीय गरजू शेतकऱ्याला बुधवारी अनिल यांचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले.तसेच अनिल यांच्या यकृत आणि दोन किडन्यांमुळे अन्य तिघांच्या आयुष्याला नवी उभारी मिळाली. त्यांचे यकृत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात, तर एक किडनी शहरातील कमलनयन बजाज रुग्णालय आणि दुसरी किडनी माणिक रुग्णालयातील रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आली. यकृत वेळेत पुण्यात पोहोचविण्यासाठी औरंगाबाद ते नेवासा आणि नेवासा ते पुणे असे ग्रीन कॉरिडोरचेही नियोजन क रण्यात आले होते. तसेच किडनी प्रत्यारोपण होणाऱ्या शहरातील दोन्ही रुग्णालयांपर्यंतही ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. (प्रतिनिधी)डॉक्टरांचे अथक परिश्रमसिग्मा ग्रुप आॅफ हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध पोटविकार शल्यचिकित्सक, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. उन्मेष टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ़ अजय रोटे, मुंबई येथील कार्डियाक सर्जन डॉ. अन्वय मुळे, सिग्मा हॉस्पिटलचे कार्डियाक सर्जन डॉ़ आनंद देवधर, डॉ़ बालाजी आसेगावकर, डॉ़ प्रमोद आपसिंगेकर, डॉ़ दीपक बोर्डे, डॉ़ सुजित खाडे, डॉ़ विनय दौंडे, डॉ़ अरुण चिंचोले, डॉ़ अभय महाजन, डॉ़ सचिन सोनी, डॉ़ गणेश बर्णेला, डॉ़ मनीषा टाकळकर, डॉ़ आशिष देशपांडे, डॉ़ शिरीष देशमुख, डॉ. राजकुमार घुमरे, डॉ़ विनोद शेटकर, मुंबई येथील डॉ़ विजय शेट्टी, डॉ़ निशा शेट्टी, पुणे येथील डॉ़ आरती गोखले, डॉ़ गौरव यांनी अथक परिश्रम घेत मराठवाड्यातील ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.