शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयशस्त्रक्रियेनंतरही दिली परीक्षा

By admin | Updated: April 17, 2017 04:46 IST

मराठवाड्यात बीडला राहणाऱ्या ११ वर्षीय समदान शेखला जन्मत: ह्रदयरोग असल्याने त्याच्या प्रकृतीत सतत बिघाड होत होता. अखेर त्याच्या ह्रदयावर मीरा रोड येथे नुकतीच शस्त्रक्रिया झाली

राजू काळे , भार्इंदरमराठवाड्यात बीडला राहणाऱ्या ११ वर्षीय समदान शेखला जन्मत: ह्रदयरोग असल्याने त्याच्या प्रकृतीत सतत बिघाड होत होता. अखेर त्याच्या ह्रदयावर मीरा रोड येथे नुकतीच शस्त्रक्रिया झाली. पण याही अवस्थेत त्याने डॉक्टराचा विश्रांतीचा सल्ला दूर ठेवत मोठ्या जिद्दीने अवघ्या आठ दिवसांत चौथीची परीक्षा दिली. सलीम शेख यांचा मुलगा समदानला जन्मत:च ह्रदयरोग होता. मात्र त्याचे निदान होत नव्हते. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सतत बिघाड होत असे. वरवरच्या उपचारानंतर त्याला काही काळापुरते बरे वाटे. पण यंदा मार्चमध्ये शाळेच्या परीक्षांचा हंगाम सुरू असताना मित्राकडे अभ्यास करताना चक्कर आल्याने तो खाली कोसळला. उन्हामुळे चक्कर आल्याचा त्याच्या पालकांचा समज झाला. परंतु, वांरवार त्याला उलट्या होऊन चक्कर येऊ लागल्याने त्याला डॉक्टरांकडे नेले. तेथे त्याला उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले. समदानची परीक्षा जवळ येत होती आणि प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे बीडमधील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईत जाण्याचा सल्ला त्याच्या पालकांना दिला. शेख कुटुंबाने बोरीवलीत नातेवाईकांचे घर गाठले आणि त्याला मीरा रोडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याचे सीटी स्कॅन व इतर तपासणीनंतर हृदयरोगाचे स्वरूप स्पष्ट झाले. हृदयातून रक्तपुरवठा करणारी मुख्य धमनी आकुंचित (कोर्क्टेशन आॅफ द अ‍ॅरोटा) असल्याने शरीराला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नव्हता. मोठ्या धमनीच्या सुरुवातीला हा अडथळा होता. त्यासाठी धमनीजवळ स्टेण्ट बसवण्याच्या शस्रक्रियेचा (कोरॅकटोप्लास्टी) निर्णय घेतला. ह्रदयविकारतज्ज्ञ डॉ. अनुप ताकसांडे यांच्या चमुने ही शस्त्रक्रिया केली. सर्वसाधारणत: ती प्रौढांवर केली जाते. त्यातही समदानच्या हृदयाची पूर्णत: वाढ न झाल्याने त्याचा रक्तदाबाचे संतुलन ठेवण्याचे आव्हानही या शस्त्रक्रियेत होते. मात्र डॉ. ताकसांडे यांच्या नियंत्रणाखाली आधुनिक उपचार पद्धतीनुसार विशिष्ट प्रकारच्या फुग्यांद्वारे आकुंचित असलेल्या हृदयातील झडपा, रक्तवाहिन्या मोठ्या करुन त्याला या त्रासातून मुक्त केले. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला किमान महिन्याची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र तो झिडकारुन त्याने आठवडाभरात परीक्षा दिली.