शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गवंड्याच्या मुलाने बनविले हृदयविकारावरील औषध!

By admin | Updated: April 10, 2017 08:06 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातही हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ झाली असून तरुणही त्यास बळी पडत

विनोद गोळे / पारनेर (अहमदनगर)बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातही हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ झाली असून तरुणही त्यास बळी पडत असल्याची चिंताजनक स्थिती आहे. हृदयविकारावर मात करण्यासाठी बायपास सर्जरी किंवा अ‍ॅन्जिओप्लास्टी करावी लागते़ मात्र, हृदयाच्या धमन्यांमध्ये गाठीच होऊ नये, यासाठी किन्ही येथील मूळचे रहिवासी असलेले शास्त्रज्ञ विनायक खोडदे यांनी चक्क औषध शोधले आहे़ अमेरिकेतील जॉन हाफकिन्स संशोधन संस्थेत ते त्यावर अधिक संशोधन करत आहेत.सहा महिन्यांपूर्वी त्यांची जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन केंद्र असणाऱ्या या संस्थेत भारताचे शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. त्यांच्या संशोधनाचा दोन वर्षांत रुग्णांना लाभ मिळू शकतो़ किन्ही येथील विनायक यांचे वडील शहाजी गवंडी काम, तर आई ताराबाई शेती करतात़ विनायक यांनी किन्ही येथे प्राथमिक व ओंकारबाबा माध्यमिक विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले़ पारनेरमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बारावीपर्यंत व पारनेर महाविद्यालयात रसायनशास्त्रात बी. एसस्सीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे रसायनशास्त्रात एम़एस्सी़ केली़ त्यांच्या संशोधक वृत्तीमुळे पुण्यातील भारतीय औषध संशोधन केंद्रात आयसर येथे त्यांची शास्त्रज्ञ म्हणून नेमणूकही झाली़२०११ पासून तेथे काम करताना महिलांच्या गर्भपिशवीच्या कॅन्सरवरील औषध शोधण्यासाठी त्यांनी संशोधन सुरू केले़ पाच वर्षांनी त्यांना यश आले. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली़ पत्नी उज्ज्वला त्यांना संशोधनात मदत करीत आहेत़ मी सध्या अमेरिकेतील जॉन हाफकिन्स संशोधन केंद्रात हृदयविकाराच्या औषधावर संशोधन करीत आहे. हे संशोधन दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. हृदयविकार दूर करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. - विनायक खोडदे, शास्त्रज्ञ