शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल मंदिरात महिलेला हृदयविकाराचा धक्का

By admin | Updated: June 26, 2016 03:00 IST

विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या मुंबईच्या उल्हासनगर येथील राजूबाई भगवानदास राजानी या महिलेला मंदिरात प्रवेश करताच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला; मात्र रुग्णालयाकडे नेण्यासाठी वैद्यकीय

पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या मुंबईच्या उल्हासनगर येथील राजूबाई भगवानदास राजानी या महिलेला मंदिरात प्रवेश करताच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला; मात्र रुग्णालयाकडे नेण्यासाठी वैद्यकीय पथक नसल्यामुळे तसेच वेळेत रुग्णवाहिकाही मिळू शकली नाही त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि प्राण गमवावे लागले.भगवानदास व त्यांच्या कुटुंबीयातील दहा जण आज सोलापूरला आले़ नंतर ते पंढरपुरात आले होते. विठ्ठल मंदिरात सकाळी साडेदहाच्या सुमारास पददर्शनासाठी मोठी गर्दी असल्याने त्यांनी मुखदर्शन घेण्याचे ठरविले, नामदेव पायरी चढून मंदिरात जाताच राजूबाई यांना धाप लागली. यापूर्वी त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना चालणे शक्य होत नव्हते. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना बाहेर नेऊन सभागृहातील पायरीवरच झोपवले. काही कर्मचाऱ्यांनी रिक्षा आणल्या, पण रिक्षात बसण्यास त्यांनी नकार दिला. अखेर अर्ध्या तासाने व्हॅनमधून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)अ‍ॅम्बुलन्स मिळाली नाहीराजूबाई यांना त्रास व्हायला लागल्यावर मंदिर कर्मचारी नारायण वाघ, प्रमोद आदलिंगे यांनी रिक्षा आणली; मात्र त्यांच्या स्थूलपणामुळे त्यांना रिक्षात नेता आले नाही. मंदिर समितीच्या कंट्रोल रूममधून १०८ या रुग्णवाहिकेला कॉल केला; मात्र दोन्ही रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णांना आणण्यासाठी पंढरपूर शहराबाहेर होत्या. शेवटी करकंबहून एक रुग्णवाहिका रवाना झाली; मात्र तोपर्यंत राजूबाई यांची प्रकृती अतिशय खालावली होती, अखेर मंदिराशेजारील एका व्हॅनमधून त्यांना नेण्यात आले. राजूबाईने केले नेत्रदानराजूबाई यांनी मरणापूर्वीच नेत्रदानाचा संकल्प करून अर्जही भरला होता. दुपारी पार्थिव मुंबईला नेईपर्यंत आठ ते दहा तासांचा अवधी लागणार असल्याने त्यांचे पती भगवानदास यांनी पंढरीतच नेत्रदानाचा निर्णय घेतला. शवविच्छेदनानंतर त्यांचे नेत्र घेण्यात आले.