शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नामुळे हृदयविकाराचा झटका

By admin | Updated: April 21, 2016 02:25 IST

पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने

डोंबिवली : पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. चिवलकर यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. पाणीटंचाईमुळे सुशिक्षितांच्या या सांस्कृतिकनगरीत कसे संघर्षाचे प्रसंग उभे राहू लागले आहेत, त्याचे हे हिमनगाचे टोक आहे.भीषण पाणीकपातीमुळे सध्या डोंबिवलीत सगळीकडे टंचाई आहे. पेंडसेनगरात अन्य काही विभागांच्या तुलनेत बरी परिस्थिती असली तरी सोसायटीच्या एकाच विंगला पाणी आले नाही. त्यामुळे काही सभासद रात्रीच्यावेळी सोसायटी अध्यक्ष चिवलकर यांना जाब विचारायला गेले. त्याचा धसका चिवलकर यांनी घेतला व त्यांनाहृदयविकाराचा झटका आला. चिवलकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २१ एप्रिल रोजी त्यांच्यावर तातडीने बायपास शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शहराच्या पूर्व भागातील पेंडसेनगरातील विजयस्मृती सोसायटीत जवळपास २५० सदनिका आहेत. सात विंग आहेत. सोसायटीचे अध्यक्ष चिवलकर हे नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे वय ५५ वर्षे आहे. चिवलकर हे सौम्य प्रकृतीचे गृहस्थ असून एकाच विंगला कमी दाबाने पाणी आले, त्याचा चढ्या आवाजात व तिखट भाषेत जाब विचारण्यात आल्याने तेअस्वस्थ झाले. अशी दमदाटीची भाषा ऐकण्याची सवय नसल्याने चिवलकर यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना त्यांचा मुलगा व पत्नीने तातडीने डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चिवलकर यांच्या मुलाने पुढील उपचारासाठी वडिलांना मुलुंडच्या एका बड्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. चिवलकर यांच्यावरील शस्त्रक्रियेचा लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकरणी चिवलकर यांचा मुलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.सकाळी व सायंकाळी कष्टाचा लोकल प्रवास करून घरी परतलेल्या डोंबिवलीकराला पाणी न आल्याची भुणभुण ऐकायला मिळाली की, त्याचे माथे भडकते. त्यामुळे पाणीटंचाईने अनेक घरांत व पर्यायाने सोसायट्यांमध्ये संघर्षाचे सुरुंग पेरण्यास सुरुवात केली आहे. पुढील किमान दोन महिने या टंचाईला तोंड द्यायचे असल्याने या शहरातील सफेद कॉलर मंडळी एकमेकांची कॉलर पकडून मारामाऱ्या करण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी पालिका व पोलीस प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. या सगळ्या प्रकाराची कल्याण-डोंबिवली महापालिकेने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. पाणीगळती, चोरी व नादुरुस्त पाइपलाइन यामुळे वाया जाणारे पाणी जर महापालिकेने वाचवले तरी सोसायट्यांमधील असे समरप्रसंग टळतील, अशी भावना स्थानिक रहिवासी व लोकप्रतिनिधी व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)