शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर १२ आॅगस्टला सुनावणी- सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: July 12, 2016 17:03 IST

माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर आता १२ आॅगस्ट २०१६ रोजी सुनावणी होणार आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 12- घरकूल प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर आता १२ आॅगस्ट २०१६ रोजी सुनावणी होणार आहे.सुरेशदादा जैन यांनी दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती जगदीशसिंग खेहर व न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा यांच्या पिठासमोर सुनावणी झाली. त्यात, सरकार पक्षाच्यावतीने घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीचा अहवाल (केस स्टेटस् डिटेल्स) न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने, घरकूल प्रकरणातील उर्वरित साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्यानंतर सुनावणीअंती सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रकरणी आता पुढील सुनावणी १२ आॅगस्ट रोजी होणार आहे. सुरेशदादा जैन यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.कपिल सिब्बल कामकाज पाहत आहेत.