शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित महापालिकेची सुनावणी

By admin | Updated: July 18, 2016 03:06 IST

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली.

पनवेल : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली. जनसुनावणीवेळी आपल्या हरकती व तक्रारी नोंदविलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणी पार पडली. महानगरपालिकेत समाविष्ट भागाचा वेध घेतल्यास अनेकांनी पनवेल महानगरपालिकेला हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र खारघर शहरातून पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यास तीव्र विरोध दर्शविण्यास येत असल्याचे याठिकाणी स्पष्ट झाले आहे. पनवेल नगरपरिषद हद्दीसह शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ अधिसूचित (नैना) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा यामध्ये समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकत्रित करून त्यात ५ लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. जनसुनावणी वेळी ६८ गावांपैकी बहुतांशी गावांनी महानगरपालिकेत समाविष्ट होण्यास तयारी दर्शविली. खारघर, तळोजामधील शेकडो रहिवासी, लोकप्रतिनिधी याठिकाणी उपस्थित होते. खारघरसाठी स्वतंत्र महानगरपालिका असावी असा सूर या जनसुनावणीच्या वेळी उमटताना दिसला. भाजपा, सेना महानगरपालिकेच्या बाजूने असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. नागरिकांच्या हरकती व सूचनांचा अभ्यास करून अहवाल तयार केला जाईल, त्यानंतर तो अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे. खारघरमधील नागरिकांनी याठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा हवाला देत सद्य:स्थितीत खारघरचा महानगरपालिकेत समावेश करू नये, अशी विनंती केली. नियोजित पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगाने चार हजारांच्या आसपास सूचना व हरकती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. नियोजित महानगरपालिका परिसर व शहरामधून सर्वात जास्त सूचना व हरकती खारघर शहर व परिसरातून आलेल्या आहेत त्याची प्रचिती जमलेले विविध पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीवरून दिसून आली. पनवेल नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवस नागरिकांमध्ये संभ्रम होता. हरकतींवर व सूचनांवरील सुनावणी आता देखील पार पडली असून लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे हे मात्र निश्चित आहे. >लवकरच चित्र स्पष्ट होणार!पनवेल नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवस नागरिकांमध्ये संभ्रम होता.हरकतींवर व सूचनांवरील सुनावणी आता पार पडली आहे. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.