शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रमेश कदमच्या जामीनावर उद्या सुनावणी

By admin | Updated: January 16, 2017 17:31 IST

अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी संशयित आरोपी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 16 - अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी संशयित आरोपी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सोलापूर जिल्हा न्यायालयात दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांनी हा आदेश देण्यासाठी १७ जानेवारी ही तारीख ठेवली आहे.

आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातून सुनील सुभाष चव्हाण या नावाने वाहन खरेदीसाठी ११ लाख ७५ हजार ५०० रुपये सोलापूरला पाठविण्यात आले होते तर सुनील चव्हाण याने कर्ज मंजुरीचा कोणताही प्रस्ताव सादर केला नव्हता. ती रक्कम घेऊन सुनील बचुटे याने वाहन खरेदी केले होते. या गुन्हायात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आ.रमेश कदम यालाही आरोपी करण्यात आले होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणात सोलापुरात आ.रमेश कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. १६ जानेवारी रोजी आ. कदम यांची पोलीस कोठडी संपली होती.त्यामुळे मुंबई पोलिसांनी आ.रमेश कदम यांना सोमवारी दुपारी तीन वाजता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. संतोष पाटील यांनी संबंधित प्रकरणामध्ये आरोपी रमेश कदम याचा मुख्य रोल आहे.त्याच्यावर असलेले गुन्हे अजामीन पात्र व गंभीर स्वरुपाचे आहे. तसेच गुन्ह्याची व्यापती मोठी आहे.ज्या नावाने प्रकरण केले तो सुभाष चव्हाण अस्तित्वातच नाही. या प्रकरणातील मूळ कागदपत्रे जप्त करणे, संबंधित पैसा जनतेचा असल्याने या साऱ्या बाबींच्या तपासासाठी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावावा अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.

कदम याने स्वत: न्यायालयाकडे आपली बाजू मांडताना माझा प्रत्यक्ष या प्रकरणाशी संबंध नसल्याचे नमूद केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद सोमवारी झाला.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांनी जामीन अर्जावर आदेश देण्यासाठी १७ जानेवारी ही तारीख ठेवली आहे.

आमदार कदम रेल्वेने आलेमुंबई पोलिसांनी आथोर जेलमधुन आ.रमेश कदम यास ताब्यात घेतले जामीन अर्जासाठी रमेश कदम यांने केलेल्या सोलापूर जिल्हा न्यायालयात सोमवारी सुनावणी होती. म्हणुन मुंबई पोलिसांनी रमेश कदम यास रेल्वेने सोलापूरात आणले. यावेळी मुंबई पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवला होता. यात पोलीस उपनिरीक्षक बी.एस. गारगोटे व पाच पोलीस हवालदारांचा समावेश होता.कार्यकर्त्यांची न्यायालयात गर्दीन्यायालयीन कोठडी संपल्यामुळे रमेश कदम यांच्या जामीन अर्जावार सोलापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. यासाठी रमेश कदम हे सोलापूरात दाखल झाले होते. रमेश कदम मोहोळ विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी असल्याने येथील कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी जिल्हा न्यायालयात गर्दी केली होती.