शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अवमान याचिकेची सुनावणी पूर्ण पीठाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 04:54 IST

कोर्टरूमध्ये सुरू असलेल्या सुनावणीचे व्हिडीओ व रेकॉर्डिंग करून न्यायालयाचा

मुंबई : कोर्टरूमध्ये सुरू असलेल्या सुनावणीचे व्हिडीओ व रेकॉर्डिंग करून न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका बॉम्बे बार असोसिएशनने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी पूर्ण पीठापुढे होणे आवश्यक असल्याचे म्हणत, हे प्रकरण पूर्ण पीठाकडे वर्ग केले. ‘ही याचिका पाहता आणि उपलब्ध असलेले पुरावे पाहता, न्यायालयाचा अवमान करण्यात आला आहे, हे स्पष्ट आहे. याचा विपरित परिणाम न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर होणार आहे,’ असे न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने म्हटले. पूर्ण पीठ म्हणजे, उच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश या प्रकरणावर सुनावणी घेऊन निकाल देतील. अवमानची कारवाई करण्यासाठी ही अगदी योग्य केस आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने गुगल व यू-ट्युबला या प्रकरणी नोटीस बजावत, तातडीने कोर्टरूमच्या सुनावणीचा व्हिडीओ काढण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, बुधवारच्या सुनावणीत गुगलच्या वकिलांनी यू-ट्युबवर गुगलचे नियंत्रण नसल्याचे सांगितले. यू-ट्युब आणि गुगल स्वतंत्र आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध नाही, अशी माहिती गुगलच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)