कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीवर मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. दोन्हीही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद मांडल्यानंतर त्याची पुढील सुनावणी शनिवारी (दि. ३ आॅक्टोबर) ठेवण्यात आली. ही सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर झाली. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याची दोनवेळा पोलीस कोठडीत रवानगी केली; पण पोलीस कोठडीत त्याच्याकडून समाधानकारक माहिती मिळविण्यास पोलीस खात्याला अपयश आले. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा त्याच्या पोलीस कोठडीत वाढ मिळण्याची विनंती न्यायालयात केली होती; पण न्यायालयाने सोमवारीच (दि. २८) त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.दरम्यान, तपासकामात समीर गायकवाड हा सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज न्यायालयाकडे सोमवारीच सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केला होता. त्याची सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली होती. आरोपीच्या वकिलांनीसमीरच्या ब्रेन मॅपिंग तपासणीसाठी सरकारी वकिलांनी केलेल्या अर्जावर आक्षेप घेतला. समीरला एक दिवसापूर्वी न्यायालयीन कोठडी दिली आहे. तूर्त त्याची मानसिकता व्यवस्थित होणे अद्याप शक्य नाही; त्यामुळे लगेच बे्रन मॅपिंग तपासणी करणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे बे्रन मॅपिंग तपासणीच्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी आठवड्याची मुदत द्यावी, अशी मागणी आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली. ही वाढीव मुदतीची मागणी खोडताना सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी, कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास गतीने सुरू आहे. तपासाला दिशाही गतीने मिळाली आहे. या तपासकामात खंड पडू नये यासाठी ब्रेन मॅपिंगची तपासणी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद मांडला. ब्रेन मॅपिंग तपासणीवर निर्णय उशिरा घेतल्यास गतीने सुरू असणाऱ्या तपासकामात खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासकामाला गती मिळणार नाही; त्यामुळे लवकर ब्रेन मॅपिंगची तपासणी करण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी सरकारी वकील बुधले यांनी केली.दरम्यान, दोन्हीही बाजंूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश आर. डी. डांगे यांनी दि. ३ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली. या सुनावणीवेळी फिर्यादीचे वकील अॅड. विवेक घाटगे, प्रकाश मोरे उपस्थित होते. (प्रतिनिधमंगळवारी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन तपासकामाबाबत चर्चा केली. यावेळी डॉ. शर्मा यांनी समीर गायकवाडला अटक केल्यानंतर तपासात काही बाबी उघडकीस आल्याचे सांगितले; पण त्यांनी अनेक बाबी गोपनीय आहेत, त्या योग्यवेळी समजतील; तपास योग्य दिशेने सुरू असल्याने कोल्हापूर पोलिसांच्या तपासकामावर विश्वास ठेवावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मेघा पानसरे यांच्यासह कॉ. दिलीप पवार, अॅड. विवेक घाटगे, प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते. मेघा पानसरेंची पोलीस अधीक्षकांशी चर्चाकॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून पकडण्यात आलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या तपासाबाबत मंगळवारी पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली.५संशयित आरोपी समीर गायकवाड याला सोमवारी न्यायालयीन कोठडी दिल्याने कळंबा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याला पकडल्यानंतर तपासाबाबत प्रथमच मेघा पानसरे यांनी पोलीस खात्याशी चर्चा केली.
ब्रेन मॅपिंगची सुनावणी शनिवारी
By admin | Updated: September 30, 2015 01:08 IST