शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

तावडेच्या हजेरीबाबत ३ जानेवारीला सुनावणी

By admin | Updated: December 23, 2016 04:44 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला हजर करण्याबाबतच्या

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला हजर करण्याबाबतच्या अर्जावर ३ जानेवारी २०१७ला जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात निर्णय होणार आहे. गुरुवारी जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तावडेला न्यायालयात हजर करायचे की नाही, याचा निर्णय बिले यांच्या न्यायालयात ३ जानेवारीला होईल, असे साळुंखे यांनी सांगितले. दरम्यान, पानसरे हत्या प्रकरणातील सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक असलेला संशयित समीर गायकवाडच्या दोषारोपपत्र निश्चितीवरही ३ जानेवारीलाच सुनावणी होणार आहे.पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हा आहे. ६ डिसेंबर २०१६ला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तावडेचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या दोषारोपपत्रातील माहिती तावडेला सांगण्यासाठी व हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग करावा, यासाठी त्याला हजर करण्याचा अर्ज तावडेचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी दाखल केला आहे. गुरुवारी हजर अर्जाबाबतची सुनावणी एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात झाली. अ‍ॅड. पटवर्धन यांनी, तावडेला दोषारोपपत्रातील माहिती सांगायची आहे, त्यासाठी त्याला न्यायालयात हजर राहण्यासाठी परवानगी द्यावी असा अर्ज यापूर्वी दिल्याचा युक्तिवाद साळुंखे यांच्या न्यायालयात केला. त्यावर साळुंखे यांनी, माझ्याकडे प्रभारी पदभार आहे. तावडेच्या या अर्जाबाबत ३ जानेवारीला निर्णय होईल, असे सांगितले. त्यामुळे तावडेला न्यायालयात हजर करायचे की नाही, याचा निर्णय या दिवशी होणार आहे. (प्रतिनिधी)