शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील दगडखाणींवर टाच

By admin | Updated: March 25, 2016 02:56 IST

बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या ८२ दगडखाणी सील करण्याची कारवाई ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केली असून, यात सर्वाधिक दगडखाणी नवी मुंबई परिसरातील आहेत.

ठाणे : बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या ८२ दगडखाणी सील करण्याची कारवाई ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केली असून, यात सर्वाधिक दगडखाणी नवी मुंबई परिसरातील आहेत. दगडखाणमालकांकडून १४ कोटी रुपये दंडासह रॉयल्टी वसूल करण्यात आली. दरम्यान पाच दगडखाणी सील करून साडेसहा कोटींचा दंड वसूल केला आहे.खाणपट्टा आदेशातील अटी व शर्तींचा नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील पाच खाणींनी भंग केल्याचे आढळल्याने गेल्या आठवाड्यात त्या सील करण्यात आल्या. आता आणखी सहा दगडखाणी बंद करण्याच्या जोरदार हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केल्या आहेत. याशिवाय, उर्वरित ६१ दगडखाणींचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. या सर्वेक्षणाद्वारे खात्री करून घेतल्यानंतरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.खाणपट्टेधारकांना धक्का - बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या या ८२ खाणींच्या मालकांकडून स्वामित्वधनापोटी सुमारे १४ कोटी वसुली करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. - आतापर्यंत ६ कोटी ५० लाखांची रक्कम वसूल झाली आहे. टोटल स्टेशन मशीनद्वारे खाणींमधून नक्की किती उपसा होतो, हे अचूकरीत्या कळत असल्यामुळे खाणपट्टेधारकांना चांगलाच धक्का बसला आहे. मालक धास्तावले : जिल्ह्यातील १४३पैकी ८२ दगडखाणी अनधिकृत व बेसुमार दगड उत्खनन करणाऱ्या असल्याचे उघड झाले आहे. यात नवी मुंबई परिसरातील खाणींचा सर्वाधिक समावेश आहे. या कारवाईपूर्वी कोल्हापूरच्या उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्ममार्फत टोटल स्टेशन मशीनद्वारे नुकतेच सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून ८२ खाणींनी प्रमाणाबाहेर उपसा केल्याचे निदर्शनास आले आहे. कारवाईच्या भीतीने दगडखाणींचे मालक चांगलेच धास्तावले आहेत.