शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रस्तावांचा ढीग

By admin | Updated: November 14, 2014 00:53 IST

विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यावर या भागाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देता यावा म्हणून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाला सुरुवात केली असली तरी प्रलंबित असलेल्या प्रश्नांची

मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा : किती प्रश्नांना न्याय देणार?चंद्रशेखर बोबडे - नागपूरविदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यावर या भागाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देता यावा म्हणून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाला सुरुवात केली असली तरी प्रलंबित असलेल्या प्रश्नांची संख्या लक्षात घेता किती प्रश्नांना ते न्याय देऊ शकतील याबाबत साशंकता आहे.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नागपुरात दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याच दिवशी नागपूर विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांना या विभागातील सर्वच खात्यांचे अनेक प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. या सर्व प्रस्तावांना मार्गी लावण्यासाठी मंत्रालय पातळीवर विशेष प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी त्यापैकी कितीचा निपटारा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बैठकीत २३ विभागांनी त्यांच्या खात्याचे सविस्तर सादरीकरण केले. त्यात महसूल खात्याचाही समावेश होता. महसूल खात्याचे अनेक प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यात नियोजन भवनाच्या प्रस्तावासह गोसेखुर्द आणि इतरही प्रस्तावांचा समावेश आहे.नियोजन भवननागपूरमध्ये जिल्हा नियोजन भवन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १०.३९ कोटी खर्चाचा आराखडा तयार आहे. नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयाच्या जुन्या जागेवर हे भवन बांधण्याचे नियोजन आहे. २८ आॅगस्ट २०१४ ला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.तीर्थक्षेत्र-पर्यटनस्थळशहरातील ताजबाग तसेच दीक्षाभूमी या स्थळांना ‘अ’वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.ट्रिपल आयटीइंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेकरिता नागपूर ग्रामीणमधील मौजा वारंगा येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेची केंद्राच्या चमूने पाहणी केली आहे. अंतिम मंजुरी अद्याप अप्राप्त आहे.गोसेखुर्द प्रकल्पप्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटपास विलंब झाल्याने त्या काळातील व्याज देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. भंडारा जिल्ह्यात गावठाण आणि शेतीचा मोबदला देताना त्यावर व्याज देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना ही रक्कम मिळाली नव्हती. यासंदर्भात १३.६७ कोटी रुपयांचा प्रस्ताव ६ मे २०१४ ला शासनाकडे सादर करण्यात आला होता तो प्रलंबित आहे.नाईक जन्मशताब्दी सभागृह२० कोटी रुपये खर्च करून जरीपटकामध्ये दिवंगत वसंतराव नाईक जन्मशताब्दी सभागृहाचे बांधकाम नियोजित आहे. २५ नोव्हेबर २०१३ मध्ये या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली. बांधकामासाठी नासुप्र किंवा सा.बा. विभाग या पैकी एका यंत्रणेची निवड करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.