शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुपरच्या आत बायो मेडिकल वेस्टचा ढीग

By admin | Updated: January 13, 2015 01:10 IST

सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जैव वैद्यकीय कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) हाताळणीची कठोर नियमावली आहे, परंतु शासकीय रुग्णालयांकडून या नियमांचे धिंडवडे निघाले आहेत.

नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात : शासकीय रुग्णालयांतील कचरा भंगारात सुमेध वाघमारे -- नागपूरसार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जैव वैद्यकीय कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) हाताळणीची कठोर नियमावली आहे, परंतु शासकीय रुग्णालयांकडून या नियमांचे धिंडवडे निघाले आहेत. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयातून रोज निघणाऱ्या कचऱ्यात ज्याला किंमत नाही तोच कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यासाठी पाठविला जात आहे, तर ज्याला किंमत आहे तो कचरा लपवून, साठवून नंतर तो भंगार व्यावसायिकाला विकला जात असल्याचे वास्तव आहे. लोकमत प्रतिनिधीने सोमवारी मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या परिसरात या कचऱ्याच्या विल्हेवाटाविषयीची पाहणी केली असता रुग्णालयातील काही सफाई कर्मचारी ते स्वत: तर काही त्यांच्या ओळखींच्या लोकांकडून हा कचरा पोत्यात भरून घेऊन जाताना दिसून आले. धक्कादायक म्हणजे, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावर छातीरोग वॉर्डाच्या बाजूला भंगारात विकण्यासाठी काढून ठेवण्यात आलेला बायो मेडिकल वेस्टचा ढीगच आढळून आला.वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅण्डेज, सिरिंज, पेशंटशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू बायो-मेडिकल वेस्टमध्ये मोडते. हा घातक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्याचा नियम आहे. यासाठी सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थेला याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील काही कर्मचारी रुग्णालयातून निघालेला कचरा विशेषत: शरीरातील अवयव, ट्युमर, कापूस, बॅण्डेज, आदी कचरा या संस्थेला देतात. तर इतर बहुसंख्य कचरा पैशाच्या हव्यासापोटी भंगार व्यावसायिकापर्यंत पोहचवितात.इंजेक्शनचा ढीगलोकमत प्रतिनिधीने मेडिकलशी संलग्न असलल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याला भेट दिली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. संवेदनशील असलेल्या छातीरोग विभागाच्या वॉर्डाच्या बाजूलाच रुग्णांच्या संपर्कात आलेली सलाईन, सिरींज, इंजेक्शनचा ढीग लागलेला होता. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता एका कर्मचाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की, हा कचरा सुपर हायजेनिक संस्थेला न देता भंगारात विकण्यासाठी काढून ठेवण्यात आला आहे.