शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवकच विकत होता गर्भपाताच्या गोळय़ा!

By admin | Updated: March 28, 2017 01:50 IST

विशेष पथकाने रंगेहात पकडले ; राजरोस सुरू होता गोरखधंदा

अकोला, दि. २७- मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी गर्भलिंग निदान करणार्‍या रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय विशेष पथकाने सोमवारी सापळा रचून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत सुनील हिम्मतराव निचळ या आरोग्य सेवकास (एमपीडब्ल्यू) गर्भपाताच्या गोळय़ा अवैधरीत्या विकताना रंगेहात पकडले. सदर कर्मचारी हा ५ हजार रुपयांत गर्भपाताच्या गोळय़ा विकत असल्याचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून करीत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.जिल्हा प्रशिक्षण केंद्रात आरोग्य सेवक या पदावर कार्यरत असलेला सुनील हिम्मतराव निचळ रा. भारती प्लॉट, जुने शहर हा गत अनेक दिवसांपासून गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या आरोग्य केंद्रामधील ह्यमिसोक्रास्टह्ण या गोळय़ा अवैधरीत्या विकत असल्याची निनावी तक्रार जिल्हास्तरीय समितीला ऑनलाइन आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपात प्राप्त झाली होती. वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे औषधांच्या दुकानांमधून कमी पैशांमध्ये मिसोक्रास्टच्या गोळय़ा घेऊन सुनील निचळ हा ५ हजार रुपये घेऊन विकत होता. या गोळय़ांच्या सेवनाने १२ आठवड्यापर्यंतचा गर्भपात होऊ शकतो, यामुळे अनेक जण सदर इसमाकडून या गोळय़ा घेत असल्याचे तक्रारीत नमूद होते. या तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने सोमवारी सापळा रचला. डमी ग्राहक म्हणून सदर इसमास मोबाइलवरून गर्भपाताच्या गोळय़ा हव्या असल्याची मागणी केली. बोलणी झाल्यानंतर भेटण्याचे ठिकाण ठरले. ठरल्यानुसार विशेष पथकातील सदस्य चौधरी विद्यालयाजवळ पोहचले. तेथे सुनील निचळ गोळय़ा घेऊन आला. डमी ग्राहक म्हणून गेलेल्या पथकातील सदस्यास गोळय़ा देत असतानाच सुनील निचळ याला दबा धरून बसलेल्या पथकातील सदस्य व पोलिसांनी रंगेहात पकडले. यानंतर सुनील निचळ यास रामदासपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, तेथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष पथकात मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत अस्वार, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कर्मचारी व रामदासपेठ पोलिसांचा समावेश होता.आरोग्य विभागातील एमपीडब्ल्यू कर्मचारी अवैधरीत्या गर्भपाताच्या गोळय़ा विकत असल्याची ऑनलाइन तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आज सापळा रचून सदर इसमास रंगेहात पकडण्यात आले असून, सदर प्रकरण पोलिसांत देण्यात आले आहे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला