शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

Health Tips - ताक पिण्याचे हे आहेत 12 फायदे

By admin | Updated: March 31, 2017 10:16 IST

बाजारातील विकतची सॉफ्टड्रिंक्स प्यायल्याने उन्हाचा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच ताक पिणे फायदेशीर आहे..

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 - एप्रिल सुरु होण्यापूर्वी उन्हाचा वाढता तडाखा, उष्माघाताचा धोका, स्वाईन फ्लूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल लक्षात घेता उष्णतेचे विकार होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मार्च ते जून या कालावधीत थकवा येणे, ताप येणे, डोके-पोट दुखणे, भूक न लागणे, मानसिक अस्वस्थता अशा अनेक समस्या उद्भवतात. उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ झाल्याचे दिसत आहे. या काळात वातावरणातील उष्णता एरवीपेक्षा जास्त असते. बाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा त्रास किंवा डिहायड्रेशन तसेच इतर समस्या टाळण्यासाठी ताक पिणे हा उत्तम पर्याय आहे. बाजारातील विकतची सॉफ्टड्रिंक्स प्यायल्याने उन्हाचा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच ताक पिणे फायदेशीर आहे..

ताक पिण्याचे हे आहेत 12 फायदे

- इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचा मुबलक साठा असल्याने ताकामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.- मसालेदार पदार्थांचा त्रास रोखण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. तसेच पोटामधील मसाल्यामुळे होणारी जळजळ कमी करते.-शरीरात वाढलेले कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ताक फायदेशीर ठरते.- उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच अ‍ॅसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काळी मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने अ‍ॅसिडिटी बरी होते.- ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या होत नाहीत. अधिक जेवण झाल्यास ताक पिल्याने मोठा फायदा होतो.- ताकामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.- ताकामध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई, के आणि बी असते. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होते.- वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.- दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.- ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.- थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.- रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.