शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित मुलीला न बघताच आरोग्यमंत्र्यांनी गाठली मुंबई

By admin | Updated: September 24, 2016 04:04 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येमुळे प्रशासन हादरले

अरीफ पटेल,

मनोर- पालघर जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येमुळे प्रशासन हादरले असून राज्यपालांनी या प्रकरणाची दखल घेऊन नुकतीच संबंधित मंत्र्यांची हजेरी घेतली होती. मात्र, कुपोषणामुळे बळी गेलेल्या रोशनीच्या घरी गेलेले आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत पालघर तालुक्यातील टेनमोरपाडा येथील कुपोषणग्रस्त सुर्वी सुदाम अत्कारी या सात महिन्यांच्या मुलीला पाहण्यासाठी गाडीतून उतरलेही नाहीत. तिला पाहण्यासाठी त्यांनी आपल्यासोबत आलेल्या एका डॉक्टरला पाठवले आणि स्वत: मात्र मुंबई गाठली. त्यामुळे आदिवासींमध्ये संतापाची भावना आहे.आरोग्यमंत्री सध्या कुपोषणाची दखल घेत पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा परिसरात कुपोषिग्रस्तांची पाहणी करीत आहेत. गुरुवारी वाडा येथे त्यांचा दौरा होता. त्यानंतर सायंकाळी ते पालघर तालुक्यातील टेननाका मोरेपाडा येथे राहणाऱ्या सुर्वी या कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या मुलीला पाहण्यासाठी निघाले. तिचे वजन केवळ दोन किलो २०० ग्रॅम आहे. मात्र, सावंत यांनी आदिवासीपाड्यापर्यंत पोहोचूनही गाडीबाहेर पायही ठेवला नाही. त्यांच्यासोबत आलेले डॉ. धुमाळ यांनी त्या मुलीची तपासणी केली. या वेळी पालघरचे शिवसेनाप्रमुख उत्तम पिंपळे उपस्थित होते. >चार दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होतीचार दिवसांपूर्वीच सुर्वीची प्रकृती गंभीर झाली होती, त्या वेळी शिवसेनेच्या दिलीप देसाई, वसंत ठाकरे यांनी तिला दुर्वेस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. डॉ. संजय बुरप्लले यांनी तिची तपासणी करून केंद्रात सुविधा नसल्याने रुग्णवाहिका बोलावून तिला डहाणू येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या आरोग्याबाबतची माहिती सावंत यांना देण्यात आली होती. ती मुलगी आता घरी आहे. तिला भेटण्यासाठीच ते टेननाका येथे आले होते. याबाबत डॉ. धुमाळ यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी जाऊन त्या मुलीची तपासणी केली. तिची प्रकृती आता बरी आहे. आरोग्यमंत्र्यांना महत्त्वाचा फोन आला, म्हणून ते न उतरता निघून गेले.’ लाल दिव्याची गाडी थांबली असल्याने कोणी तरी मंत्री आला आहे, ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. मात्र, गाडी पाड्यावर न जाता फिरून परत गेली. >बालमृत्यूंची आकडेवारी लपवणार नाही-दीपक सावंतवाडा : राज्याच्या आदिवासी भागांत होणारे बालमृत्यू जाहीर करावेत, बालमृत्यूंची आकडेवारी कोणीही लपवून ठेवू नये, अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याने राज्य सरकार कोणत्याही प्रकारे बालमृत्यूंची आकडेवारी लपवणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी वाड्यात दिली. त्यांनी पेठरांजणी येथील कुपोषणाने दगावलेल्या रोशनी सवरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार गांभीर्याने प्रयत्न करत असून रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पावले उचलली जातील. मुंबईतील नामांकित रुग्णालयांतील डॉक्टरांसोबत गुरुवारीच बैठक झाली आहे. या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र दत्तक घेऊन मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर आरोग्य विभागाच्या यंत्रणेबरोबरच सेवा देतील, असे त्यांनी सांगितले.योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील असून भविष्यात बालमृत्यूचा दर कमी करण्यावर विशेष भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी माजी आमदार दौलत दरोडा, शिवसेना गटनेते नीलेश गंधे, जि.प. सदस्य प्रकाश निकम, गिरीश पाटील, प्रकाश किणी आदींसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.>आरोग्यमंत्री कुपोषणाची बळी ठरलेल्या रोशनीच्या कुटुंबीयांना भेटले, मात्र त्यांनी कुपोषणग्रस्त सुर्वीच्या घरी जाणे टाळले. त्यामुळे नाराजी आहे.