शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मंत्र्यांच्या ‘पीए’वर गुन्हा

By admin | Updated: June 22, 2016 04:08 IST

महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारीवरुन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळींविरोधात मंगळवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुंबई : महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारीवरुन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळींविरोधात मंगळवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांना कुठल्याही क्षणी अटक करू शकतात. सुनील माळी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित महिला डॉक्टरने मंगळवारी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जळगाव येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार महिलेने सोमवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. हा जामीनपात्र गुन्हा असून तो न्यायालयात सिद्ध झाल्यास किमान पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक पोपट यादव यांनी सांगितले. पोलिसांनी सुनील माळींना चौकशीसाठी बोलावले, मात्र ते सोमवारी तसेच मंगळवारीही पोलीस स्टेशनमध्ये आले नाहीत. माळी यांना केवळ सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांचे निलंबन करून अटक करावी, अशी मागणी महिला डॉक्टरने केली आहे. माळी यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यानंतर अनेक महिला डॉक्टरांचे राज्यभरातून फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित महिलेला पाठिंबा देत प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्षा तारूलता टोकस यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली. तत्काळ गुन्हा दाखल करण्याची गरज होती. मात्र चार तास बसवून ठेवल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिसांना एक फोन आला होता. त्याची चौकशी गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी करायला हवी, असेही टोकस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)