शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागच सलाईनवर

By admin | Updated: September 22, 2016 01:46 IST

विविध संसर्गजन्य आजारांनी वेढा घातलेला असताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे या समस्येवर उपाय तर नाहीच

पुणे : शहराला डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया यांबरोबरच विविध संसर्गजन्य आजारांनी वेढा घातलेला असताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे या समस्येवर उपाय तर नाहीच; पण आरोग्य विभागासाठी मान्य असलेली अनेक पदेही दीर्घ काळापासून रिक्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग सलाईनवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या रिक्त पदांची संख्या थोडीथोडकी नसून तब्बल ५१४ इतकी असल्याचे पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत मिलिंद काची यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून हे समोर आले आहे. १,६६४ पदांची मान्यता असूनही त्यातील केवळ १,१५० पदेच भरली गेली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहराचा वाढता आलेख, त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि त्यासाठी असणारी अपुरी सुविधा यांचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. एकीकडे खासगी वैद्यकीय सेवा महाग होत असल्याची ओरड होत असताना शहरातील मोठा वर्ग महापालिकेच्या आरोग्य सुविधांवर अवलंबून आहे. मात्र, या सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने सुविधा मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)>वस्ती क्लिनिक : कर्मचारी कोठून आणणार?शहरात सप्टेंबरअखेरपर्यंत ५० वस्ती क्लिनिक चालू होणार असून, ही संकल्पना आरोग्य सुविधेच्या दृष्टीने उत्तम आहे. मात्र, या ठिकाणीही पालिकेतीलच आरोग्य विभागातील कर्मचारी काम करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. त्यामुळे एकीकडे आरोग्याच्या योजना राबवीत असताना त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने सध्या असलेल्या यंत्रणेवरच त्याचा भार येण्याची शक्यता आहे. >पालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त असणाऱ्या पदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, विविध आजारांचे तज्ज्ञ यांच्याबरोबरच प्रयोगशाळेतील विविध पदे तसेच परिचारिका स्तरावरील आणि व्यवस्थापन स्तरावरीलही अनेक पदे समाविष्ट आहेत. आता ही पदे नेमकी कधी भरली जाणार, याची वाट पाहावी लागणार आहे. एरवी पालिकेच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात असणारी गर्दी आता असणाऱ्या साथीच्या आजारामुळे वाढली आहे. यामध्ये लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. मात्र, या गर्दीमुळे सध्या कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असली, तरीही ती विशेषज्ञ आणि इतर आहेत. त्यामुळे त्याचा पालिकेतील आरोग्याच्या कामावर फारसा परिणाम होत नाही. कीटक विभागातील ३५० पदे रिक्त आहेत; मात्र प्रत्येक वॉर्ड आॅफिसला ३० ते ४० पदे करारावर घेण्याची मान्यता देण्यात आल्याने सध्याच्या साथीच्या आजारांच्या कामावर या रिक्त पदांचा फारसा परिणाम होत नाही. - डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका