शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘आदिवासी मुलांची आरोग्य तपासणी करा’

By admin | Updated: June 9, 2016 04:19 IST

सर्वच अंगणवाड्यांतील मुलांची पावसाळ्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यासाठी फिरती आरोग्य पथके नेमावी, तसेच या भागात सातत्याने आरोग्य शिबिरे घ्यावी

ठाणे : नवसंजीवन योजनेंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी भागामधील सर्वच अंगणवाड्यांतील मुलांची पावसाळ्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यासाठी फिरती आरोग्य पथके नेमावी, तसेच या भागात सातत्याने आरोग्य शिबिरे घ्यावी. त्याचबरोबर दुर्गम व अतिसंवेदनशील क्षेत्राबरोबर आदिवासी भागात अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आदिवासी विभागामार्फत वाहन उपलब्ध करून तो कसा सुरळीत होईल, याकडे लक्ष देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सूचना केल्या आहेत. या योजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक झाली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेण्यात येईल. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांशी संपर्क होण्यासाठी रस्त्यांची डागडुजी करण्यास त्यांनी सांगितले. आदिवासी क्षेत्रातील श्रेणी-३ व श्रेणी-४ मधील सर्व बालकांना आंतररु ग्ण सेवा व तातडीने औषधोपचार कसे मिळतील, त्याचबरोबर या भागात रोजगार कसा मिळेल, याकडे लक्ष द्यावे. खावटी कर्जवाटप व्यवस्थित करा. अंगणवाड्यांना पूरक पोषक आहार त्वरित कसा मिळेल, याकडे लक्ष देण्यात यावे. आदिवासी भागातील शहापूर २३३, भिवंडीतील ७३, मुरबाड ७७ व अंबरनाथ तालुक्यातील ४ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (जेडब्ल्यूएसएम) यांनी तत्काळ तपासणी करावी, अशी सूचना दिली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, जिल्हापुरवठा अधिकारी डॉ. मोहन नळदकर व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)