शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दूध डेअरीच्या भूखंड विक्रीतून मुख्यालय

By admin | Updated: July 2, 2016 03:31 IST

जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर आदिवासी जिल्हा म्हणून उदयाला आला आहे.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर आदिवासी जिल्हा म्हणून उदयाला आला आहे. या जिल्हा मुख्यालय इमारतीसह जिल्हाधिकारी कार्यालय व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाची जबाबदारी सिडकोवर असल्याचा शासन निर्णय बुधवारी काढण्यात आला. दूध डेअरीसाठी राखीव असलेल्या ४४० : ५७.९० हेक्टर भूखंडापैकी १०३ - ५७.९० हेक्टरवरील या बांधकामाच्या खर्चासाठी ३३७ हेक्टरवरील विकसित भूखंडविक्री करून सिडकोला निधी उभा करावा लागणार आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च तीन हजार ५८० कोटी आहे.सिडकोला जिल्हाधिकारी कार्यालय इमारतींसह जिल्हा कार्यालयांचे पालघर नवनगर विकसित करायचे आहे. यासाठी लागणारा खर्च विकसित भूखंड विक्रीतून करावा लागणार असून एवढे करूनही निधी कमी पडल्यास राज्य शासनाकडे त्याची मागणी करण्याचा अधिकार सिडकोला देण्यात आला आहे. मौजे पालघर, कोळगाव, मोरेकुरण, नंडोरे, दापोली, टेंभाडे व शिरगाव या गावांच्या परिसरातही शासनाचा हा ४४० हेक्टरचा भूखंड आहे. कृषी विभागासह पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय खात्याचा हा भूखंड आहे. या कार्यालयांसाठी लागणाऱ्या भूखंडापेक्षा तिप्पट भूखंड विकसित करून त्यांची विक्री करण्याची मुभा सिडकोला मिळाली आहे. हा प्रकल्प ‘पालघर नवनगर विकास प्राधिकरण’ या नावाने घोषित केला आहे. तीन वर्षांच्या कालावधीत उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पासाठी महसूल व वन विभागालाही जागा विनामूल्य द्यावी लागणार आहे.प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा व सत्र न्यायालय आदी इमारतींसह ३९ जिल्हा कार्यालयांसाठी नवीन प्रशासकीय इमारत, नाट्यगृह, विश्रामगृह, अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सिडकोला पहिल्या टप्प्यात बांधावी लागणार आहेत. त्यासाठी लागणारे पक्के रस्ते, पदपथ, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन गटारे, वीजपुरवठा आदी पायाभूत सोयीसुविधा द्याव्या लागणार आहेत. >या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज अद्यापही घेण्यात आलेला नाही. ही संपूर्ण जागा शासनाची असल्यामुळे त्यासाठी भूसंपादनाचा खर्च लागणार नाही. प्राप्त होणारे काही भूखंड विकसित करून त्यांच्या विक्रीतून निधी उभारावा लागणार आहे. तत्पूर्वी या संपूर्ण जागेचा नकाशा तयार करून इमारती बांधकामांचे लेआउट केल्यानंतरच त्याचा खर्चाचा अंदाज येणार असल्याचे सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी लोकमतला सांगितले.