शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

बंद गोदामात आढळले अज्ञात व्यक्तीचे शिर

By admin | Updated: January 2, 2017 22:55 IST

कोराडी नाक्याजवळच्या बंद गोदामात एक मानवी शिर लटकवून असल्याचे आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 2 - कोराडी नाक्याजवळच्या बंद गोदामात एक मानवी शिर लटकवून असल्याचे आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे शिर वायरने (केबल) बांधून (लटकवून) ठेवले आहे, तर धड बेपत्ता आहे. शिराखाली खाली काही हाडंही पडून आहेत. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू झाली आहे. कोराडी नाक्याजवळ हे गोदाम असून ते अनेक दिवसांपासून बंद असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी काही जण गोदामाजवळ गेले. त्यातील एकाने बंद गोदामाच्या खिडकीतून डोकावले असता त्याला मानवी शिर लटकलेले दिसले. त्यामुळे घाबरून हे सर्व जण चौकाकडे पळत आले. नंतर सांगाड्याची वार्ता कर्णोपकर्णी सर्वत्र पोहोचली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. माहिती कळाल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कोराडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. मृताचे शिर वायरने बांधून वर लटकवले होते. त्याचे धड बेपत्ता होते. शिराच्या खाली काही हाड़ं पडली होती. केस वगळता शिर पुरते कुजलेले होते. त्यामुळे हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृताचे धड कुठेतरी पुरले किंवा फेकून दिले असावे, असा पोलिसांकडून अंदाज बांधण्यात आला. खूप दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असावा, असाही संशय आहे. पोलिसांनी मृताचे शिर आणि हाडं ताब्यात घेऊन ती रुग्णालयात पाठविली. त्यानंतर ती फॉरेंसिकलाही पाठविली जाणार आहे. दरम्यान, केवळ शिर आणि खाली काही हाडे आढळल्याने हा नरबळीचाच प्रकार असावा, अशी जोरदार चर्चा परिसरात सुरू झाली. मृत व्यक्तीने जर आत्महत्या केली असती तर त्याचे संपूर्ण शरीर तेथे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले असते, असा तर्क वजा अंदाज नागरिक व्यक्त करीत आहेत. उंदराने मृतदेह कुरतडला असता तर तेथे सर्व रक्तमास पडले असते. गोदाम बंद असल्यामुळे अन्य प्राणी तेथे शिरण्याची आणि धड पळविण्याची शक्यता नाही. मृताचे शिर वगळता संपूर्ण धड बेपत्ता असल्याने आणि खाली केवळ हाडं पडली असल्याने हा नरबळीचाच प्रकार असल्याच्या शंकेला पोलिसांकडून आॅफ द रेकॉर्ड दुजोरा दिला जात आहे. पोलिसांनी यासंदर्भात स्पष्टपणे बोलण्याचे टाळले आहे. मृत कोण, मारले कसे ? ज्याचे शिर लटकवून ठेवण्यात आले, तो तरुण कोण आहे आणि त्याला मारणारे आरोपी कोण आहे, ते तूर्त अंधारात आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, खूप दिवसांपासून बंद असलेल्या गोदामात आरोपी शिरले कसे, असाही प्रश्न आहे. त्यांनी मृताची हत्या तेथेच केली आणि धड तेथून पळवून नेले की आधी हत्या केली आणि गोदामात नरबळीसाठी केला जातो, तसा पूजा विधी केला की काय, त्याबाबत कोराडी पोलिसांकडे वारंवार विचारणा करूनही माहिती मिळाली नाही. रात्री ९ वाजेपर्यंत गुन्हा दाखल व्हायचा आहे, असे पोलीस ठाण्यातून सांगितले जात होते.