शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणजे शोभेची बाहुली

By admin | Updated: November 14, 2015 00:30 IST

फैयाज : देवल स्मारक मंदिरच्यावतीने ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल’ पुरस्कार प्रदान

सांगली : नाट्यपंढरी सांगलीतील संगीत नाट्य जगतातील दोन मानाचे ‘भावे आणि देवल’ पुरस्कार मला मिळाले, हे माझे भाग्य असून, नाट्य चळवळीच्या उर्जितावस्थेसाठी नाट्यरसिकांकडून वारंवार प्रगतीची मागणी होत असते. मात्र, नाट्य संमेलनाध्यक्षाला नसलेले अधिकार आणि निधीच्या कमतरतेअभावी इच्छा असूनही नाट्य चळवळीसाठी काही करु शकत नसल्याची खंत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि नामवंत नाट्यकलाकार, गायिका फैयाज यांनी शुक्रवारी व्यक्त केली. देवल स्मारक मंदिरच्यावतीने ‘नाट्याचार्य गोविंंद बल्लाळ देवल’ पुरस्कार फैयाज यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुरेश साखवळकर होते. आमदार सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. फैयाज म्हणाल्या की, येत्या १५ नोव्हेंबरला माझ्या कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण होत असताना, संगीत नाटक क्षेत्रातील दोन महत्त्वाचे ‘विष्णुदास भावे’ व ‘देवल’ पुरस्कार मिळाले. पुरस्काराने काम करण्याची उमेद दुपटीने वाढते. नाट्य संमेलनाची अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नाट्य कलाकारांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. मात्र, अध्यक्षा म्हणून काहीच अधिकार नसल्याने, केवळ सत्कार स्वीकारण्यात वेळ जातो. या पदाचा नाट्य चळवळीच्या प्रगतीसाठी फायदा होत नाही. नाट्य क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाबद्दल त्या म्हणाल्या की, नाट्यक्षेत्रात काम करणारे नवीन कलाकार केवळ अभिनय, गायन किंवा व्यक्तिमत्त्वावर भर देतात. मात्र, गायकाकडे ज्याप्रमाणे रियाज आवश्यक आहे, त्यापध्दतीने कलाकाराकडे अभिनय, गायन अणि व्यक्तिमत्त्वाचा मिलाफ आवश्यक आहे. सध्या नाट्यक्षेत्रात अभिनयाच्या कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोणी पुढाकार घेत नाहीत, ही चिंताजनक बाब असून अभिनयात चिंतन, मनन आवश्यक आहे. यावेळी सुरेश साखवळकर यांच्याहस्ते फैयाज यांना ‘देवल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. गाडगीळ म्हणाले की, सांगली ही नाट्य पंढरी असून या ठिकाणी सोयी सुविधा पुरवण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जातील. नाट्यरसिकांसाठी विश्रामबाग येथे दर्जेदार नाट्यगृह उभारण्यात येईल.देवल स्मारक मंदिरचे अध्यक्ष शरद बापट, अंजली भिडे, चंद्रकांत धामणीकर, शशांक लिमये, संजय रुपलग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रसिकांचे प्रेम महत्त्वाचे...अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकाराला रसिकांचे मिळणारे पाठबळ महत्त्वाचे असून अभिनयानंतर मिळणारी दाद लाखमोलाची असते. रसिकांनी त्या कलाकाराकडे पाठ फिरविल्यानंतर तो कलाकार खऱ्याअर्थाने संपतो, अशी खंत व्यक्त करीत, मिळणाऱ्या पुरस्काराने कलाकाराला प्रोत्साहन मिळत असल्याचेही फैयाज यांनी सांगितले.