शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लबाडीने प्रवेश घेऊनही डॉक्टरची पदवी मिळणार

By admin | Updated: May 14, 2017 05:42 IST

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविलेल्या ऐश्वर्या धनंजय पाटील या विद्यार्थिनीस अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर ‘एमबीबीएस’ची पदवी द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘नॉन क्रीमी लेअर’ (एनसीएल)च्या उत्पन्न मर्यादेत बसत नसूनही तसा दाखला मिळवून त्याआधारे चार वर्षांपूर्वी पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविलेल्या ऐश्वर्या धनंजय पाटील या विद्यार्थिनीस अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर ‘एमबीबीएस’ची पदवी द्यावी. मात्र तिला सवलतीच्या फीमध्ये शिक्षण देण्यासाठी झालेल्या खर्चाची अंशत: भरपाई मिहणून तिने राज्य सरकारला १० लाख रुपये द्यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.ऐश्वर्या ही चिंचवड येथे चेतना हॉस्पिटल चालविणाऱ्या डॉ. धनंजय पाटील यांची मुलगी आहे. तिने ज्या ‘एनसीएल’ दाखल्याच्या आधारे ‘ओबीसी’ कोट्यामधून प्रवेश घेतला होता तो दाखला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये रद्द केला. त्याविरुद्ध ऐश्वर्याने केलेल्या रिट याचिकेवर न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने वरील निकाल दिला. न्यायालयाने म्हटले की, आम्ही आधी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे ऐश्वर्या शिकत राहिली व आता ती शेवटच्या वर्षाला आहे. चुकीच्या ‘एनसीएल’ दाखल्याच्या आधारे तिने प्रवेश घेतल्याने ‘ओबीसी’मधील अन्य एका पात्र विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला नाही हे खरे असले तरी ऐश्वर्याचा प्रवेश आता रद्द करून काहीच हंशिल होणार नाही. ज्या विद्यार्थ्याचा प्रवेश हुकला त्याला आता तो मिळू शकणार नाही. मात्र असे असले तरीही तिला सवलतीच्या फीमध्ये शिकविण्यावर झालेल्या खर्चाची अंशत: भरपाई म्हणून तिने १० लाख रुपये सरकारला देण्याच्या अटीवरच तिला पदवी मिळू शकेल.याखेरीज यापुढे आयुष्यात कधीही ‘ओबीसी’ची सवलत न घेण्याचे हमीपत्रही ऐ्श्वर्याने न्यायालयात लिहून द्यायचे आहे. शिवाय पदवी मिळाल्यानंतर तिला राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच वर्षे काम करावे लागेल. दरम्यानच्या काळात तिला पदव्युत्तर प्रवेश मिळाला तर ते शिक्षण झाल्यावर तिला पुन्हा राहिलेला काळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करावे लागेल. यापैकी कोणत्याही अटीचा तिने भंग केला तर तिची डॉक्टरकीची पदवी राज्य सरकार काढून घेऊ शकेल, असे न्यायालयाने नमूद केले.ऐश्वर्याच्या वडिलांचे स्वत:चे कोट्यवधी रुपयांचे इस्पितळ असूनही त्यांनी मुलीला वैद्यकीय प्रवेश मिळावा यासाठी बनावट ‘एनसीएल’ दाखला मिळविण्याचा खोटेपणा करावा, याबद्दल न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या सुनावणीत ऐश्वर्याच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल व्ही. अंतुकरकर यांनी, राज्य सरकारसाठी अ‍ॅड. विजय पी. मालवणकर यांनी तर महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठासाठी अ‍ॅड. राजशेखर गोविलकर यांनी काम पाहिले.>गौरी घरतमुळे बिंग फुटलेऐश्वर्याने ज्या वर्षी एमबीबीएसला प्रवेश घेतला त्याच वर्षी ओबीसी कोट्यातून प्रवेश मिळू न शकलेल्या गौरी हेमंतकुमार घरत हिच्यामुळे हे बिंग फुटले. एकूण १६ विद्यार्थ्यांनी बनावट ‘एनसीएल’ दाखले देऊन प्रवेश घेतल्याचा आरोप करणारी याचिका गौरीने सन २०१४ मध्ये उच्च न्यायालयात केली. त्यावर झालेल्या आदेशानुसार सामाजिक न्याय खात्याकडून चौकशी झाली व त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ऐश्वर्याचा दाखला बनावट ठरवून रद्द केला होता.