शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

... अन सर्वांसमोर ‘त्यांनी’ काढल्या ‘उठबश्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 15:42 IST

शहरात उघडयावर शौचास जाणा-यांना पकडून त्यांना उघडयावर शौचास जावू नका असे सांगूनही काही जण ते पाळत नसल्याने वाशिम नगरपरिषद स्वच्छता विभागाच्यावतीने नविन ‘फंडा’ तयार करण्यात आला.

ऑलाइन लोकमत
वाशिम, दि. १२ - नगरपरिषद वाशिमच्यावतीने शहरात उघडयावर शौचास जाणा-यांना पकडून त्यांना उघडयावर शौचास जावू नका असे सांगूनही काही जण ते पाळत नसल्याने नगरपरिषद स्वच्छता विभागाच्यावतिने नविन ‘फंडा’ तयार करण्यात आला. यामुळे उघडयावर शौचास जाणाºयांची चांगलीच पंचाईत झाली आहे. उघडयावर शौचास जातांना दिसल्याबरोबर पथक त्याला पकडून आणून सर्वांसमोर उठबश्या काढण्याची शिक्षा देत आहेत. यामुळे अनेकजण खजिल होवून शौचालयाचा वापर तर ज्यांच्याकडे शौचालय नाही असे तो बांधण्याचा विचार करीत आहेत.
उघडयावर शौचास बसल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. उघडयावर शौचास जावू नये म्हणून शासनाच्यावतिने शौचालय बांधकामासाठी अनुदानही दिल्या जाते. अनेकांनी अनुदान घेवून शौचालयाचे बांधकाम केले पण त्याचा वापर केल्या जात नसल्यान नगरपरिषदेच्यावतिने धडक मोहीम हाती घेतली आहे. दररोज सकाळी नगरपरिषदेचे स्वच्छता निरिक्षक जितु बढेल, लाला मांजरे, दशरथ मोहळे, मुकादम व सफाई कर्मचारी शहरातील वेगवेगळया भागात जावून उघडयावर शौचास जाणाºयांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. उघडयावर शौचालयास जाणाºया नागरिकांनाही नगरपरिषदेच्या या मोहीमेची कल्पना झाल्याने अनेकजण पहाटे उठूनचं आपला कार्यक्रम उरकवून घेत असल्याची चर्चा आहे. सर्वांसमोर उठबशा काढाव्या लागत असल्याने अनेकांनी याची धास्ती घेतली आहे.