शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

त्यांनी गाव सोडले; पण मोबाईलने घरी आणले

By admin | Updated: February 2, 2015 23:56 IST

त्या दोघांची चित्तरकथा : घरातून गायब झालेल्या अंतवडीच्या मुलांना रांजणगावातून पोलिसांनी घेतले ताब्यात

जगन्नाथ कुंभार -मसूर -दोन अल्पवयीन मुलांनी पळून जाण्यासाठी घर सोडले. मात्र, त्यांचे नशीब फुटले. या काळात त्यांचा मोबाईल हरविला, तळीरामांनी पैसे घेऊन पोबारा केला, ही चित्तरकथा आहे अंतवडी, ता. कऱ्हाड येथील गायब झालेल्या मुलांची. मुलांच्या गायब होण्याने पालक अन् पोलीसही चक्रावले होते. सरतेशेवटी रांजणगाव, जि. अहमदनगर येथून त्यांना ताब्यात घेतले.  याबाबत अधिक माहिती अशी की, अंतवडी येथील ॠत्विक (वय १५) व नीरज (१५) ही दोन्ही मुले घरात कुणालाही न सांगता अचानक गायब झाली होती. त्यामुळे पालकांनी शोधाशोध करूनही सापडली नाहीत. त्यांनी मसूर पोलीस ठाण्यात ‘आमच्या मुलांना कोणी तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे,’ अशी तक्रार दाखल केली. याचे गांभीर्य ओळखून उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड यांचे एक पथक व सहायक फौजदार प्रकाश कोकाटे यांचे एक पथक त्यांना शोधण्यासाठी तयार केले. पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड, पोलीस नाईक सुधाकर भोसले, सुनील शेलार यांच्या पथकाने मुलांच्या घरी संपर्क साधून प्राथमिक तपास केला असता. नीरजने घरातील दुधाचे अडीच हजार रुपये व मोबाइल गायब झाल्याचे समजले. ॠ त्विक हाही त्याच्याबरोबर गेला आहे; परंतु त्याच्याकडे काही पैसे नाहीत, असे सांगण्यात आले. त्या मुलांनी रांजणगाव येथून केलेल्या मोबाईलच्या आधारेच तपासकामी मदत होऊन मुले आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता, ती दोन्ही मुले काहीही न झाल्याच्या आर्विभावात म्हणाले, ‘ आम्ही २५ जानेवारीला अंतवडी सोडून जाण्याचा बेत आखला होता.  त्यानुसार नेमके कुठे जायचे, हे ठरवले नव्हते. त्यानुसार २६ जानेवारीला सकाळी अकरा वाजता कपडे मोबाइल व पैसे घेऊन कऱ्हाड रेल्वेस्थानक गाठले. दुपारी साडेतीनला पुण्याकडे जाणारी रेल्वे आली आणि त्यामध्ये बसून आम्ही पुणे गाठले. पुणे रेल्वे स्टेशनवर रात्र काढली. तेथे मोबाईल चोरीला गेला.  पहाटे त्यांना दोन तळीरामांनी गाठले. ‘तुम्हाला काम पाहीजे का?,’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘हो’ म्हणून सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी रांजणगावला जाणाऱ्या रेल्वेत बसले. रेल्वेतूनच यांनी त्या तळीरामांचा मोबाइल घेऊन ‘आम्ही नगरला आहोत, आमचा शोध घेऊ नका,’ असा फोन केला. तळीरामांनी रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत नेले. तेथे रात्र झाल्यावर ती रात्र एका खोलीत काढली. सकाळी तळीरामांनी पैशांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी तीनशे रुपये दिले. हे पैसे घेऊन तळीराम पसार झाले. आपण फसलो आहोत, हे लक्षात आले व ते दोघेही तेथून पळून तडक रस्त्यावर आले. तोपर्यंत इकडे पालकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मुलांनी पालकांना केलेल्या फोनचा आधार घेत पोलिसांनी तपास केला असता. मुले रांजणगाव येथे आढळून आली. मुलांच्या फोनमुळे तपासाला गती -अल्पवयीन मुले होती. त्यांचा फोन चोरीला गेला. तरीही त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून फोन केला. या फोनचे लोकेशन सुरुवातीस अहमदनगर दाखवत होते. त्यादृष्टीने तपास करत असतानाच दुसऱ्यांदा त्यांनी केलेल्या फोनचे लोकेशन रांजणगाव दिसून आले. त्यामुळे रांजणगाव पोलिसांची मदती घेऊन मुलांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले,’ असे मत पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड यांनी व्यक्त केले.