शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

पत्नीचा खून करून प्रेत जाळले

By admin | Updated: December 24, 2016 19:42 IST

दिसायला चांगली नसल्याच्या कारणावरून कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथे पत्नीचा घरातच खून करून प्रेत जाळल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली.

ऑनलाइन लोकमत 
कळमनुरी,  दि. 24 -  दिसायला चांगली नसल्याच्या कारणावरून कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथे पत्नीचा घरातच खून करून प्रेत जाळल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली.
 
मयत कविता खंदारे (२७) हिस तू दिसायला चांगली नाही. वाळलेली आहे, या कारणावरून सासरच्या मंडळीकडून सतत शारिरीक व मानसिक त्रास दिला जात होता, अशी तक्रार तिच्या भावाने दिली आहे. यातूनच तिला २४ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या पूर्वी जीव मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत गावातील पाणंद रस्त्यावरील कचºयात नेवून जाळले. यात प्रेत पूर्णपणे जळून खाक झाले. २४ डिसेंबर सकाळी ग्रामस्थांनी जळालेले प्रेत पाहिले व माहिती पोलिस ठाण्याला दिली. सुरुवातीला कविताने  आत्महत्या केल्याचे सांगून बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मयताच्या नातेवाईकांनी केला. राहुल सुदाम इंगळे यांच्या फिर्यादीवरून भानुदास किसन खंदारे (पती), नीलाबाई खंदारे (सासू), सुरेश खंदारे (चुलत दीर) या तिघांविरूद्ध कलम ३०२, २०१, ४९८, (अ) ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोनि कुंदनकुमार वाघमारे, सपोनि सुधाकर आडे, गजानन बर्गे, एन.एस. पवार, बांगर, थिटे घटनास्थळी गेले व पंचनामा केला. सेलसुरा येथेच मयताचे शवविच्छेदन डॉ. दिलीप मस्के यांनी केले. घटनास्थळाला पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी भेट दिली.  तिन्ही आरोपींना अटक केल्याचे सपोनि आडे यांनी सांगितले.