शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

‘तो’ खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा!

By admin | Updated: May 12, 2015 01:58 IST

डोंबिवली येथील भोंदूबाबा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. तसेच त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत

ठाणे/कल्याण : डोंबिवली येथील भोंदूबाबा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. तसेच त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या तथा आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली असून यासंदर्भात त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.शारीरिक संबंध ठेवल्यास घरात पैशांचा पाऊस पडेल, अशी बतावणी करून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा विजय ठोंबरे आणि त्याची सहकारी जानकी यांना ठाणे बालकांचे हक्क व संरक्षण युनिटच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. मुंब्रा परिसरात राहणाऱ्या एका मुलीला तर त्याने दिल्लीतही नेल्याची बाब समोर आली असून राष्ट्रीय पातळीवर मुलांचा अनैतिक व्यापार करणाऱ्या टोळीशी या घटनेचा काही संबंध आहे का? याबाबतचाही सखोर तपास होणे आवश्यक असून पालकांचाही या गुन्हयात सहभाग असल्याने पिडीत मुलीच्या छोटया बहिणीला संरक्षण मिळणे अतिशय आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, रविवारी गोऱ्हे यांनी ठाणे येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. लैंगिक शोषणाचे प्रकार पूर्णपणे थांबवायचे असतील तर असे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या भोंदूबाबाच्या यवतमाळ येथील उस्तादला अटक करा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. या भोंदूबाबाचे दिल्लीपर्यंत नेटवर्क असून पीडित मुलीला दिल्लीपर्यंत नेण्यात आले होते. तिने तेथील भोंदूबाबाकडे जाण्यास विरोध केला, असे तपासातआढळून आले आहे. अशा भोंदूबाबांचे मोठे रॅकेट असून अल्पवयीन मुलींना लक्ष्य करणे, गरीब वस्तीत फिरून तेथे पैशांची लालूच दाखविणे, असे प्रकार त्यांच्याकडून सुरू आहेत. अघोरी विद्येचा वापर करून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त केल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्या म्हणाल्या.