शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
2
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
3
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
4
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
5
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
6
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
7
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
8
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
9
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
10
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
11
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
12
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
13
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
14
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
15
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
16
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
17
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
19
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
20
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?

त्याच्याकडून अन्य महिला पोलिसांचाही छळ

By admin | Updated: December 16, 2014 03:40 IST

वरिष्ठ अधिकारी महिलेला अश्लील शेरेबाजी करणारा पोलीस निरीक्षक अन्य महिला कॉन्स्टेबलचा छळ करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे

जमीर काझी, मुंबईवरिष्ठ अधिकारी महिलेला अश्लील शेरेबाजी करणारा पोलीस निरीक्षक अन्य महिला कॉन्स्टेबलचा छळ करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याच्या चौकीत कार्यरत असलेल्या या तरुणी त्याच्या आमिषाला बळी पडत नसल्याने काही महिन्यांपासून तो त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे सांगण्यात आले.वरिष्ठ महिला निरीक्षकाबाबत खात्यातील दोघा अधिकाऱ्यांकडून झालेल्या अश्लील शेरेबाजीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली असून, दिवसभर हा चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आता जाग आली असून, या प्रकरणाची चौकशी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत. पोलीस निरीक्षक ढेपाळेकडून त्याच्या चौकीत काम करीत असलेल्या दोघा महिला पोलिसांचा छळ सुरू आहे. त्यांना बंदोबस्त, वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी जाणीवपूर्वक ड्युटी लावणे, रोज चौकीत येऊन हजेरी लावण्याची सक्ती केली जात असल्याचे समजते. महिलेबाबत अश्लील शेरेबाजी करणारा ढेपाळे व सहायक निरीक्षक पाटील सध्या उपनगरातील वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत आहेत. दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेली महिला अधिकारी आणि हा ढेपाळे सहा महिन्यांपूर्वी एका शाखेत नियुक्तीला होते. मात्र त्यांच्यात पटत नसल्याने तेव्हापासून ढेपाळे तिच्याबद्दल इतरांकडे अश्लील व अपमानास्पद वक्तव्य करीत होता. पाटीलला त्याबाबत माहिती असल्याने त्याने एका तिऱ्हाईताशी बोलताना महिला अधिकाऱ्याबद्दल अश्लील वक्तव्य केले. समाज रक्षकांकडून महिला अधिकाऱ्यांबद्दलची अवमानकारक शेरेबाजी निषेधार्थ आहे. याबाबत संबंधितावर भादंवि ३५४ अन्वये गुन्हा दाखल करायला पाहिजे, त्यासाठी उद्या पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिले जाईल, राज्य महिला आयोगाच्या सदस्या व राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.