शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

एचडीएफसी बँकेचे ५१ लाख लुटले

By admin | Updated: December 23, 2015 01:54 IST

एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये भरणा करणाऱ्या कॅशव्हॅनमधून ५१ लाखांची रोकड घेऊन सिक्युरिटी कंपनीचा कस्टोडीयन पसार झाला.

वसई : एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये भरणा करणाऱ्या कॅशव्हॅनमधून ५१ लाखांची रोकड घेऊन सिक्युरिटी कंपनीचा कस्टोडीयन पसार झाला. ही घटना सोमवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंचोटी ब्रीजजवळ घडली. स्वप्निल जोगळे असे आरोपीचे नाव असून, वालीव पोलिसांनी त्याची पत्नी आणि भावाला ताब्यात घेऊन चौकशी सुुरू केली आहे.एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये रोख रक्कम भरण्याचे काम सायंटीफीक सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीकडून केले जाते. सोमवारी संध्याकाळी कंपनीची कॅशव्हॅन (क्र. एमएच ४३/ एपी/ ६०६५) भांडुप येथून वसई-विरार भागातील बँकेच्या एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी आली होती. व्हॅनमध्ये चालक, एक कस्टोडियन व गार्ड यांचा समावेश होता. दुसरा कस्टोडीयन स्वप्निल जोगळे हा त्यांना वसई पूर्व कामण येथील एटीएम केंद्रावर भेटला. त्यानंतर एचडीएफसी बँकेच्या कामण व नायगाव एटीएम मशिनमध्ये रोख रक्कम भरण्यात आली.जोगळे याने कॅश लुटण्याचा आधीच प्लॅन केला होता. त्यानुसार नायगाव येथील मशिनमध्ये कॅश भरल्यानंतर बँकेचे आॅडिटर आले असल्याने कामण येथे जावे लागेल असा असा बहाणा करून जोगळेने कॅशव्हॅन पुन्हा कामणच्या दिशेने वळवली. गाडी मुंबई-अहमदाबाद हायवेवरील चिंचोटी ब्रीजजवळ आल्यानंतर स्वप्निलने गाडी बाजूला थांबवण्यास सांगितले. पुढच्या एटीएमजवळ कॅश काढता येणार नाही असा बहाणा करून स्वप्निलने व्हॅनच्या तिजोरीतील ५१ लाख रुपये स्वत:जवळील बॅगेत भरले; आणि कुणाला काही कळायच्या आत तिथून पळ काढला. मंगळवारी सकाळी कंपनीचे शाखा व्यवस्थापक बरुण मंडल यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीची पत्नी व त्याचा भाऊ या दोघांकडून काही रक्कमही हस्तगत केल्याचे सांगण्यात आले. स्वप्निल जोगळे मात्र अद्याप फरार आहे.