शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

हायकोर्टाचा सरकारला हजार कोटींचा दणका!

By admin | Updated: October 15, 2014 04:13 IST

बिवलकर कुटुंबियांचे वास्तव्य सध्या पुण्याच्या नव्या पेठेत आहेत.

मुंबई: नियोजित नवी मुंबई विमानतळासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीपैकी १५७ एकर जमीन पुण्यातील सरदार बिवलकर कुटुंबियांच्या खासगी मालकीची असल्याचा निर्वाळा देत या जमिनीची भरपाई बिवलकर यांना देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. प्रचलित बाजारभावानुसार या जमिनीची किंमत १,००० ते १,२०० कोटी रुपयांच्या घरात होईल, असा अंदाज आहे.बिवलकर कुटुंबियांचे वास्तव्य सध्या पुण्याच्या नव्या पेठेत आहेत. पनवेल तालुक्याच्या उलवे गावातील सर्व्हे क्र. ५१/० मध्ये असलेली ही जमीन १५७ एकर २५ गुंठे असून नियोजित विमानतळाची मुख्य धावपट्टी येथे बांधण्यात यायची आहे. या जमिनीवरील आपली मालकी जाहीर करून घेण्यासाठी आधी इंदिराबाई नारायण बिवलकर यांनी व त्यांच्या पश्चात जयंत व गंगाधर या त्यांच्या मुलांनी १९८९ व २०१० मध्ये दाखल केलेल्या दोन रिट याचिका मंजूर करून न्या. अनूप मोहता व न्या. अमजद सैयद यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. याला शह देण्यासाठी ‘सिडको’ने पश्चातबुद्धीने नंतर केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. या जमिनीचा ताबा पुन्हा आपल्याला मिळावा, ही बिवलकर यांनी केलेली विनंती मात्र अमान्य केली गेली. न्यायालयाने म्हटले की, सर्व बाबींचा साकल्याने विचार करता ही जमीन बिवलकर यांच्या खासगी मालकीची आहे, असा निष्कर्ष आम्ही काढला आहे. परंतु नवीन मुंबई वसविण्यासाठी इतर जमिनींसह ही जमीनही सरकारने ‘सिडको’ला दिली आहे व १९७० पासून ती ‘सिडको’च्या ताब्यात आहे. तेथे विमानतळाचे कामही सुरु झाले आहे. त्यामुळे सरकारने ही खासगी जमीन् संपादित केली आहे असे मानायला हवे व सरकारने बिवलकर यांना भरपाई द्यायला हवी. या सुनावणीत बिवलकर यांच्यासाठी अ‍ॅड. महेंद्र घेलानी यांनी, राज्य सरकारतर्फे अ‍ॅडव्होकेट जनरल दरायस खंबाटा व अतिरिक्त सरकारी वकील नितीन देशपांडे यांनी आणि ‘सिडको’साठी ज्येष्ठ वकील व्ही. ए. थोरात यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)